Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने गोदावरीला पवित्र महत्त्व प्राप्त झाले, अशी श्रद्धा आहे. देव-दानवांच्या बारा दिवसांच्या युद्धाचे प्रतीकात्मक नाते बारा वर्षांशी जोडले गेले आणि त्यातून सिंहस्थ कुंभमेळ्याची बारा वर्षांची परंपरा निर्माण झाली. कुंभ हा कोणत्याही एका संप्रदायाचा नसून संपूर्ण मानवजातीचा आहे. येथे वय, जात किंवा इतर कोणताही भेद न पाहता केवळ श्रद्धेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे गोदावरीत प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कचरा टाकू नका, नदी स्वच्छ ठेवा तसेच शेतात आणि परिसरात किमान एक झाड लावा, असे आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले.



सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाचा भक्तिमय समारोप


तीन दिवस रंगलेल्या ‘कुंभ भक्ती संगम’मध्ये देशभरातील विविध संतपरंपरा, कीर्तन, अभंग, गुरबाणी, संकीर्तन आणि भक्तिसंगीताचा अनुभव रसिकांना मिळाला. ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘तीन्ही माझ्या मना’ आणि ‘अनंत जन्मिचे विसरत दुःख, पाहा तुझे मुख पांडुरंगा’ अशा अभंगांच्या भक्तिमय सादरीकरणाने समारोप सोहळा अधिक भावपूर्ण झाला. ठक्कर डोम येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगमाचा अखेरीस ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रभावी कीर्तनाने भक्तिमय समारोप झाला.



यावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले की, शरीरात पंचप्राण असतात, त्याचप्रमाणे संतसंप्रदाय हा समाजाचा प्राण आहे. आज माणूस पैशावर अधिक प्रेम करू लागला आहे; मात्र पैसा हीच माणसाची उंची नसून अध्ययन, संस्कार, संतविचार आणि कर्तव्यभावनेतून व्यक्तिमत्त्वाची खरी उंची निर्माण होते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांच्या कार्याचा उल्लेख करताना संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते, असे त्यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर हे श्रेष्ठ तीर्थ असून श्री निवृत्तीनाथांच्या चरणी सर्व तीर्थांचे महत्त्व सामावले आहे, असेही ते म्हणाले.


ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांच्या अलौकिक कार्याचा संदर्भ देत ज्ञानेश्वरीतील सुमारे नऊ हजार ओव्या आणि लाखो शब्दांमधून संतविचारांची व्यापकता दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. ज्ञानेश्वरांच्या कार्याचा पाया निवृत्तीनाथ असून नामदेव महाराजांनी त्यावर कळस चढविला, असे सांगत त्यांनी संतपरंपरेचे महत्त्व स्पष्ट केले. काकड्याच्या मालिकांतील अभंग, संतवाङ्मय आणि त्यातील जीवनदृष्टी यांचा संदर्भ देत आजच्या पिढीने संतविचार समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.



आई-वडील, संत, गुरू, ग्रंथ यांच्याप्रती कृतज्ञता ठेवा


सर्वांनी आई-वडील, संत, गुरू, ग्रंथ आणि भगवंत यांच्याप्रती कृतज्ञता ठेवली पाहिजे, असे आवाहन इंदुरीकर महाराजांनी केले. घरात प्रेम आणि संस्कारांचे गाणे कायम राहिले पाहिजे. सोन्याचा दागिना सोन्याला, कापड धाग्याला आणि गूळ गोडीला सोडत नाही; त्याचप्रमाणे आई-वडील, संत आणि कर्तव्याची साथ माणसाने कधीही सोडू नये, असा संदेश त्यांनी दिला. आई, वडील किंवा नातेवाईकांच्या मृत्यूनंतर त्यांची राख गोदावरीत टाकू नका; त्याऐवजी त्यांच्या स्मरणार्थ वृक्ष लावा. प्रत्येकाने गोदावरी स्वच्छ ठेवण्याबरोबरच आपले मनही निर्मळ करावे. कुंभमेळा यशस्वी करणे ही जशी सरकारची जबाबदारी आहे, तशीच ती आपल्या सर्वांचीही आहे. सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवावे. असे आवाहनही त्यांनी केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''