जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. यात डोंबिवलीच्या तीन, पुण्याच्या दोन आणि पनवेलच्या एका नागरिकाचा समावेश होता. या सहा जणांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर राज्यातील सहा मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले महाराष्ट्रातील सहा जण
- अतुल मोने, डोंबिवली
- संजय लेले, डोंबिवली
- हेमंत जोशी, डोंबिवली
- संतोष जगदाळे, पुणे
- कौस्तुभ गणबोटे, पुणे
- दिलीप देसले, पनवेल