मुंबईच्या जंगलात ५४ बिबटे; १० वर्षात २३ ने वाढ

मुंबई (प्रतिनिधी): संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याला लागून असलेल्या आरे वसाहतीत सध्या ५४ बिबट्यांचे अस्तित्व असून त्यात ४ पिल्लांचाही समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटीने (डब्लूसीएस) केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. २०१४-१५ या कालावधीत ३१ बिबटे होते, तर दशकभरात या संख्येत २३ ने वाढ झाली आहे. या अभ्यासाठी महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या संयुक्त सहकायनि कॅमेऱ्याच्या मदतीने दिर्घकालीन निरीक्षण केले.


फेब्रुवारी ते जून २०२४ या फालावधीत करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणातून बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. या सर्वेक्षणात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे वसाहत आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य या क्षेत्रांचा समावेश होता. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणामध्ये सक्रीय सहभाग घेतला आणि त्यासाठी विशेष प्रशिक्षणही घेतले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीत एकूण ५४ बिबटे आढळले, यामध्ये ३६ मादी, १६ नर आहेत. त्याचबरोबर बिबट्यांच्या चार पिल्लांचीही नोंद हा अधिवास जपणे किती महत्वाचे आहे हे या अभ्यासातून अधोरेखित होते. अशा अभ्यासामुळे वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अचूक माहिती तर मिळतेच; परंतु त्याचबरोबरच त्याच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी मोठी मदत होते - अनिता पाटील, वन संरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली आहे.


वसईजवळील तुंगारेश्वर अभयारण्यातही तीन प्रौढ बिबट्यांची नोंद झाली. २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅप्सच्या मदतीने विबट्यांची गणना करण्यात आली. या माध्यमातून यावेळी २१ बिबट्यांची नोंद झाली होती. यामध्ये १६ मादी, १० नर आणि ५ बिबटे होते. दाट लोकवस्तीतही बिबट्याचे अस्तित्व टिकून आहे हे फार महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर