पेणमध्ये ग्राहकांची पीओपी मूर्तींनाच मागणी

पेणच्या हजारो गणेशमुर्ती परदेशात रवाना


पेण : दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पेणच्या सुबक मूर्ती परदेशात दाखल झाल्या आहेत. एकट्या पेणच्या दीपक कला केंद्रातील पीओपी आणि मातीच्या मिळून पंधरा ते अठरा हजार मूर्ती परदेशात दाखल झाल्या आहेत. गणेशमूर्तींबाबत सध्या गाजत असलेला पीओपी मातीच्या मूर्तींवरील बंदीचा मुद्दा चर्चेत असला तरी बाप्पाची मूर्ती बुकिंग करायला आलेल्या ग्राहकांनीच पीओपीच्या गणेशमूर्तींना पसंती असल्याचे स्पष्ट केले आहे. तर कारखानदार देखील मूर्ती बनविण्यासाठी लागणारा वेळ, हाताळण्यासाठी वजनाने हलक्या आणि ग्राहकांच्या वाढलेल्या मागणीनुसार लवकर तयार होणारी मूर्ती ही पीओपीचीच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.



पेणच्या गणेशमुर्ती ऑस्ट्रेलिया, थायलंड, युरोप, अमेरिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका आदी ठिकाणी परदेशात रवाना होत आहेत. मात्र केंद्रीय प्रदूषण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यापासून गणपती कारखानदारच काय तर मूर्ती विकत घेणारे होलसेल आणि किरकोळ ग्राहक देखील संभ्रमात पडले आहेत.
पेणच्या दिपक कला केंद्रात आलेल्या रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील ग्राहक आदित्य काश्राम यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पीओपीच्या मूर्तीला प्राधान्य दिले आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. आणि कोकणाचा भौगोलिक विचार केला असता याठिकाणी पर्जन्यमान अधिक असल्याने पावसाळ्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बऱ्याच रस्त्यांवर खड्डे आणि विशेषतः डोंगराळ भाग असेल तर रस्ते सुद्धा वाहून जात असल्याने मातीची मूर्ती असेल तर वाहतूक करताना या मूर्तीची मोडतोड होण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे पीओपीची मूर्ती ही वजनाने हलकी असल्याने ती हाताळणे आणि विसर्जन करणे देखील फायद्याचे ठरते.




पेण मधील दीपक कला केंद्राचे मालक सचिन समेळ यांनी मातीचे बाप्पा बनवायचे असतील तर ते बनवायला अधिक वेळ, सुकायला कठीण, चुकून मोडतोड झाल्यास पुन्हा जोडायला जाणारा वेळ तसेच किमतींमधील फरक यामुळे मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपीच्या मूर्ती बनवणे सुद्धा सोपे जाते आणि त्याला ग्राहकांची देखील अधिक पसंती असल्याचे सांगितले आहे.
ग्राहकांच्या आणि कारखानदारांच्या भूमिका पाहता जवळ्पास साठ ते सत्तर टक्के कल हा पीओपीच्या पसंतीकडे जात असल्याने केंद्रीय प्रदूषण मंडळाने पीओपीवर घातलेल्या बंदीवर पुन्हा एकदा विचार केला जावा अशाच प्रतिक्रिया उमटत असल्याचे सिद्ध होत आहे.
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी