Virat Kohli : निवृत्तीनंतर विराट आता देश सोडून जातोय का? विमानतळावरचा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तब्बल १४ वर्षांनंतर विराटने हा मोठा निर्णय घेतला असून, त्याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. यानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.


विमानतळावरील त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. काही जणांनी विचारलंय – "विराट आता देश सोडून जातोय का?", तर काही जण भावूकही झाले आहेत.


कसोटीमधून निवृत्ती आणि अनुष्काचं सिनेमापासून अंतर, या दोन्ही गोष्टी पाहता, काही नेटकऱ्यांनी अंदाज वर्तवला की हे दोघं कायमचं परदेशात स्थायिक होणार का?



एका युजरने लिहिलंय की, “वहिनी थांबा… दादालाही थांबवा!” तर दुसऱ्याने विचारलं – “गाडीत बसून निवृत्ती घेतली आणि आता थेट देश सोडून चाललात का?”


अलीकडच्या काळात हे दोघं बराचसा वेळ परदेशातच राहताना दिसले. वामिका आणि अकाय या दोन मुलांसोबत त्यांचं लंडनमध्ये स्थायिक होणं चर्चेत आहे.


काही दिवसांपूर्वी विराट सोशल मीडियावरही चर्चेत आला होता, जेव्हा त्याच्या अकाऊंटवरून अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅनपेजला लाईक मिळालं होतं. नंतर त्याने इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे झालं, असं स्पष्टीकरण दिलं.


या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधून एक युग संपलं, पण त्याचा वैयक्तिक आयुष्य अजूनही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.




Comments
Add Comment

Family Kirana Store TVF : टीव्हीएफच्या ‘फॅमिली किराणा स्टोअर’चा नवा विक्रम; अवघ्या १० महिन्यांत यूट्यूबवर तीन सीझन प्रदर्शित

गज्जू भैयांच्या (Gajju Bhaiya) किराणा दुकानाचे दरवाजे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होण्यासाठी सज्ज झाले आहेत! द

Moushumi Chatterjee: मौसमी चॅटर्जींवर कोसळला दु:खाचा डोंगर, ज्येष्ठ अभिनेत्रीच्या पतीचे निधन

हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

TV Serial Ramayana : रामायण मालिकेतील रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांना कशी मिळाली ? 100 कलाकारांच्या ऑडिशननंतर रामानंद सागर यांनी घेतला होता मोठा निर्णय

TV Serial Ramayana Throwback : भारतीय मनोरंजनविश्वात ‘रामायण’ या मालिकेचे स्थान आजही अढळ आहे. रामानंद सागर यांच्या या लोकप्रिय

Big Boss 20: 'कैरेक्टर ढीला..तेरी पैंट में नाड़ा नहीं', लव्ह आणि स्काऊट मध्ये जोरदार वाद; बिग बॉस मध्ये मोठा राडा

Big Boss 20: बिग बॉस 20 च्या घरात 'कैरेक्टर ढीला' या गाण्यावरून लव्ह गिल आणि स्काऊट ओपी (Scout OP) यांच्यात जोरदार वाद रंगला.

Govinda and Komal Rani Viral Photos: गोविंदासोबत कोमल राणीचे खास फोटो; राखी सावंत संतापली!

[caption id="attachment_1074657" align="alignnone" width="800"] अभिनेत्री कोमल राणीनं अभिनेता गोविंदासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.(Photo:

वीकेंडला पाहा या 5 भन्नाट पौराणिक कथा ! OTT वर हिंदीत उपलब्ध आहेत 'या' भव्य मायथॉलॉजिकल फिल्म्स

वीकेंड आला की अनेकांना एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे मनोरंजनासाठी नेमकं काय पाहावं? काही जण मित्रांसोबत बाहेर