RCB vs KKR: पावसाचा व्यत्यय कायम, केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, आरसीबी अव्वल

बंगळुरू: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. यामुळे गतविजेत्या कोलकाताचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. दरम्यान, केकेआर १२ अंकांसह सहाव्या स्थानावर आहे. मात्र प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपल्या आहे. तर १७ गुणांसह आरसीबी पहिल्या स्थानावर आहे. म्हणजेच आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये कन्फर्म झाला आहे. आरसीबीचे आणखी २ सामने शिल्लक आहेत.

आयपीएलच्या दुसऱ्या भागातील पहिल्याच सामन्यात पावसाचाच खेळ रंगला. मोठ्या संख्येने हा सामना पाहण्यासाठी चाहते आले होते. कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची ही पहिलीच संधी होती. त्याला चीअर करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते सफेद रंगाची जर्सी घालून मैदानात आले होते. मात्र पावसामुळे टॉसही झाला नाही.

आरसीबी अव्वल


आयपीएल २०२५च्या गुणतालिकेत सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अव्वल आहे. आरसीबीचे १२ सामन्यांमपैकी ८ सामन्यांतील विजयासह १७ गुण आहेत. या सामन्यात विजयानंतर प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.
Comments
Add Comment

IND vs NZ 4th ODI: रोहित शर्मा आणि इशान किशनची चूक भारतीय संघाच्या अंगलट आली, 120 धावांचा फटका बसला Video

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना माऊंट माऊगानुई येथे सुरू आहे. या सामन्यात भारताच्या बाजूने

W,W,W..! पहिल्या षटकात भारताच्या शून्य धावा आणि तीन विकेट, असं पहिल्यांदाच घडलं आणि रोहित-विराटसोबत दुसऱ्यांदा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा वनेड सामना बे ओव्हलच्या माऊंट माऊंगनाई येथे होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा

Dakar Youth olympics 2026 : भारताचा ऐतिहासिक सुवर्णप्रवास; 9 पदकांसह पदकतालिकेत दिमाखदार कामगिरी

डकार (सेनेगल) : डकार येथे सुरू असलेल्या चौथ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय युवा खेळाडूंनी दमदार

आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत अक्षर पटेल; फ्रँचायझीमध्ये खळबळ!

नवी दिल्ली : आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर येत

IND Vs NZ 4th ODI Live Streaming: चौथा वनडे सामना कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या खेळपट्टीसह सर्व बाबी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तीन सामन्यानंतर 2-0 अशी स्थिती आहे.

IND vs NZ: रोहित शर्मासोबत ओपनिंग कोण करणार? इशान किशन नाही तर या खेळाडूचं नाव चर्चेत

[caption id="attachment_1074512" align="aligncenter" width="800"] भारत न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना ओव्हल मैदानात शुक्रवारी खेळला जाणार आहे. या