शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये काय घडलं ? कसं जप्त झालं कोट्यवधींचं घबाड ?

धुळे : गुलमोहर शासकीय विश्रामगृहातून पाच कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याचा आरोप उद्धव गटाने केला आहे. कंत्राट देण्याच्या बदल्यात कंत्राटदाराकडूनच लाच घेण्यात आली. ही रक्कम एका आमदाराने पीएच्या हाती सोपवण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले होते. आमदाराच्या सांगण्यावरुन कंत्राटदार रोख रक्कम घेऊन आला. पण आयत्यावेळी पोलिसांनी धाड टाकून रक्कम जप्त केली. जप्त केलेली रक्कम एकूण ११ आमदारांमध्ये वाटण्याचे नियोजन होते असाही आरोप उद्धव गटाने केला आहे. ज्या खोलीतून रक्कम जप्त झाली ती खोली आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्या नावावर नोंदवलेली होती, असाही आरोप उद्धव गटाने केला आहे. उद्धव गटाचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी फेटाळला आहे. महाराष्ट्र शासन आणि राज्यातील आमदारांच्या समितीला बदनाम करण्यासाठी उद्धव गटानेच एक खेळी केल्याचा संशय आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या विधीमंडळाची अंदाज समिती तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात आहे. धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा ही समिती घेणार आहे. समितीत २९ आमदार आहेत. या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. खोतकरांसह समितीचे ११ आमदार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच आमदारांना लाच म्हणून देण्यासाठी पाच कोटींची रोकड गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आणण्यात आली होती, असा आरोप उद्धव गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. तर ठोस पुरावे नसताना फक्त आरोपांची राळ उडवून देणे ही माजी आमदार गोटेंची जुनी खोड असल्याचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे उद्धव गटाच्या उपस्थितीत खोली क्रमांक १०२ ला कुलुप लावण्यात आले. पोलीस आल्यावर उद्धव गटाच्या उपस्थितीतच हे कुलुप काढून खोलीत तपासणी करण्यात आली. माजी आमदार अनिल गोटे यांनी पाच कोटींची रोकड आल्याचा आरोप केला. पण खोलीतून पोलिसांनी एक कोटी ८४ लाख २०० रुपये एवढीच रोकड जप्त केली आहे. खोलीत एवढेच पैसे होते, असे पोलिसांनी सांगितले.
Comments
Add Comment

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने पुन्हा वेग घेतला असून, उपमुख्यमंत्री

Sunil Tatkare: विलीनीकरण आणि आमदारांच्या फुटीच्या चर्चांमध्ये तथ्य नाही; सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण

मुंबई(सुहास शेलार): ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून, ४१ आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या

Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान तटकरे-फडणवीस भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच

जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच,

गोकुळवर कब्जा करण्याची सरकारला गरज नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षात पाच शासकीय सदस्यांची नियुक्ती

Maharashtra Political News: यंदाची शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळी; नवनाथ बन यांचे प्रतिपादन

Maharashtra Political News: राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, मराठवाडा परिसर आणि विदर्भासह