कोंझर घाटातील रस्ता खचला; महाड-रायगड मार्ग बंद

किल्ले रायगड परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला


संजय भुवड


महाड : महाड-रायगड रस्त्यावर कोंझर घाटातील मोठ्या धबधब्या समोरील रस्ता कालपासून कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याच्या झोतात खचून वाहून गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे किल्ले रायगड परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून या भागातील जनतेचे आणि पर्यटकांचे मोठे हाल झाले आहेत.


महाड तालुक्यात गेल्या २४ तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. महाड रायगड मार्गावर कोंझर घाटात असलेल्या मोठ्या धबधब्या समोर एका मोरीचे काम सुरु असून हे काम अर्धवट अवस्थेत असताना या धबधब्यातून मोठ्या प्रवाहाने पाणी वाहू लागल्याने हा रस्ता खचून वाहून गेला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.



महाड रायगड रस्त्याचे काम गेल्या चार वर्षा पासून अक्षय कस्ट्रक्शन या ठेकेदारामार्फत सुरु असून या मार्गावरील अनेक मो-या तसेच रस्त्याचे काम आजही अर्धवट अवस्थेत आहे.


दोन दिवसांपुर्वी खासदार सुनिल तटकरे यांनी लाडवली पुलाची पाहणी केल्यानंतर या पुलाचे काम दोन दिवसात सुस्थितीत करावे असे आदेश देत कामात दिरंगाई करणा-या ठेकेदाराला दिवसाला १० हजाराचा दंड ठोठावण्याचे आदेश बजावले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच हा मार्ग बंद होण्याची नौबत आली असून या मार्गावर अर्धवट अवस्थेत असणा-या मो-यांच्या कामाच्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रायगड मार्गावरील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

अंधेरीत एलपीजी सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून आगीचा भडका; आई-मुलगी गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरात एलपीजी सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून आगीचा भडका उडाल्याची घटना

हवामानात मोठा बदल! महाराष्ट्रात हाड गोठवणारी थंडी घेऊन येतेय नवीन लाट; 13 नोव्हेंबरपासून हुडहुडी भरणार!

महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्याने मोठे बदल होत असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आता थेट राज्यातील

Dakar Youth olympics 2026 : भारताचा ऐतिहासिक सुवर्णप्रवास; 9 पदकांसह पदकतालिकेत दिमाखदार कामगिरी

डकार (सेनेगल) : डकार येथे सुरू असलेल्या चौथ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय युवा खेळाडूंनी दमदार

Wedding Muhurat November 2026: तुळशी विवाहानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईसाठी नोव्हेंबरमध्ये फक्त 4 शुभ मुहूर्त!

Wedding Muhurat November 2026: नुकताच दिवाळी हा सण पार पडला. दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होते. देवउठनी एकादशी आणि तुळशी

ठाणे गावदेवी मार्केट आग दुर्घटना; सागर शिंदेंच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी

ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला 21 मे 2026 रोजी पहाटे तीन वाजताच्या

आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत अक्षर पटेल; फ्रँचायझीमध्ये खळबळ!

नवी दिल्ली : आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर येत