ठाणे गावदेवी मार्केट आग दुर्घटना; सागर शिंदेंच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी

ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला 21 मे 2026 रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग शमवण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलातील 42 वर्षीय केंद्र अधिकारी सागर शिंदे आणि प्रभाग समिती कार्यालयामध्ये कार्यरत 55 वर्षीय सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांचा या आगीत मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सागर शिंदे यांना मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला होता. मात्र शिंदे यांच्या निधनानंतर या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला 21 मे 2026 रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग शमवण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलातील 42 वर्षीय केंद्र अधिकारी सागर शिंदे आणि प्रभाग समिती कार्यालयामध्ये कार्यरत 55 वर्षीय सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांचा या आगीत मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सागर शिंदे यांना मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला होता. मात्र शिंदे यांच्या निधनानंतर या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


कर्तव्य बजावत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला. शिंदे यांच्या पश्चात त्यांची आई जयश्री, पत्नी माधुरी व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. तर काळू गाडेकर यांचे मूळ गाव गाडेकरवाडी, गंगापूर, आंबेगाव, जिल्हा पुणे हे असून मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव तेथे नेण्यात आले. गाडेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.



या दोन्ही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत तातडीने सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या अनुषंगाने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनासोबत पाठपुरावा करत आज स्व. सागर शिंदे यांच्या पत्नी माधुरी सागर शिंदे यांना ठाणे महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबतचे नियुक्ती पत्र खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के, नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, अतिरिक्त आयुक्त 2 मेजर डॉ. नितीन राठोड, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके आदी मान्यवर उपस्थित होते.


यापूर्वी, आरक्षक काळू गाडेकर यांचा मुलगा तेजस काळू गाडेकर याला सदर दुर्घटनेनंतर एका महिन्याच्या आत महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले होते. या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाकडून त्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Maatrubhumi: सलमानच्या 'मातृभूमी'मधील 5 संवाद प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झाले

Maatrubhumi: बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये

Devendra Fadanvis: कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी पिके विकसित करा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

नागपूर: रामटेक तालुक्यातील कवडक येथे दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित स्व. दत्ता मेघे स्मृती दालन,

Thane Railway Station: ठाणेकरांचा रेल्वे प्रवास होणार सोपा! फलाट 5-6 वर नवा एस्केलेटर, फलाट 2 वर मोफत स्वच्छतागृह

Thane Railway Station: मध्य रेल्वेचे ठाणे हे प्रमुख आणि गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. ठाण्यावरून पनवेल, सीएसएमटी, कर्जत,

Gold Rate : सोनं खरेदीची संधी की आणखी दरवाढीची प्रतीक्षा? डिसेंबरमध्ये मोठा उलटफेर शक्य!

Gold Rate : दिवाळी नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा

Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे पहिली पत्नी

Avinash Arun Second Marriage: नुकताच ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ (Prahaar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे

Mumbai Bomb Threat: मुंबई-पुण्याला बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालयासह 5 ठिकाणे रडारवर

Mumbai Bomb Threat: मुंबईसह पुण्यातदेखील बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल आला आहे. मुंबईमध्ये महापौरांच्या कार्यालयाचा