मग त्यावेळी आदित्य ठाकरे लंडनमधील नदीची पाहणी करीत होते की पॅरिसमधील?

आशिष शेलार यांचा रोखठोक सवाल


मुंबई : मुंबईकरांची प्रामाणिक सेवा आम्ही करत आहोत आणि कायम करत राहणार. मुंबईत नालेसफाईची कामे सुरु असताना आम्ही पाहणी केली, चुकीचे आढळले तिथे प्रशासनाला सवालही विचारले. मात्र मुंबईचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार आदित्य ठाकरे मुंबईत नालेसफाई होत असताना, रस्त्यांची कामे होत असताना कुठे होते..


लंडनमध्ये जावून थेम्स नदीची आणि पॅरिसमध्ये जावून सीन नदीची पाहणी करत होते का? २६ जुलै २००५ च्या महाप्रलयावेळी महानगरपालिकेचे नेतृत्व करीत असलेले उद्धव ठाकरे रस्त्यांवर उतरले होते का?, या सर्व प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी आधी द्यावीत, असा प्रहार मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री अॅड आशिष शेलार यांनी केला आहे.


मुंबईतील मुसळधार पाऊस व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन, यंत्रणांकडून सुरु असलेली कार्यवाही याबाबत मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी सोमवारी संवाद साधला.


याप्रसंगी मंत्री शेलार म्हणाले की, पहिले तर आदित्य ठाकरे यांना जनतेने सडेतोड प्रश्न विचारला पाहिजे की, पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला आहे. तर नालेसफाई होत असताना, रस्त्यांची कामे होत असताना आदित्य ठाकरे तुम्ही होतात कुठे? मिस्टर इंडियासारखे गायब झाला होतात.
आणि मग ते पाहणी कुठे करत होते? लंडन मधली थेम्स नदी आणि पॅरिस मधली सीन नदी यांची आदित्य ठाकरे पाहणी करत होते का? आज मुंबईकरांच्या वाताहातीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. मागील २५ वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन यामुळे मुंबईची अशी अवस्था झाली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे 'चोर मचाये शोर' याच्यापेक्षा दुसरं काही नाही, असे शेलार यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर