पावसाच्या उघडीपीने देवळ्यात मशागतीला वेग

देवळा : येथील कसमादे भागात अवकाळी पाऊस भाग बदलून बदलून रोजच तसेच दिवसाआड हजेरी लावत असल्याने खरीपपूर्व मशागत कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता; परंतु गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे.


नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती, फळबागांमधील कामे जोरात सुरू झाली आहेत. सामान्यतः मे महिन्यात खरीपपूर्व कामांची तयारी सुरू होते. नांगरणी, ढेकूळ फोडणे, खते टाकणे, बांधबंदिस्ती, फळबागांची पानगळ करणे, औषधे देणे, घरांची-चाळींची डागडुजी करणे आदी कामे केली जात असतात.परंतु यावर्षी अवकाळी पावसाने मे महिन्याच्या मध्यातच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या कामाचे व शेतीच्या मशागतीचे नियोजन कोलमडले आहे. अद्याप बहुतांश शेतकऱ्यांची नांगरणीसह इतरही मशागतीची कामे बाकी आहेत. शेते ओली असल्याने शेतात खते टाकता येत नाहीत.


उन्हाळ कांदे काढणी झाल्यानंतर शेतांची नांगरणी होऊन उन्हाने त्यातील ओलसरपणा कमी व्हायला हवा होता परंतु या पावसामुळे जमिनीतील ओलसरपणा कायम राहिल्याने पुढील पिकात बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. काहींनी आताच मका पेरणी करण्याची तयारी सुरू केली आहे. तर काहींनी मका पिकाची पेरणी मृग नक्षत्रातच करावी असा आग्रह धरला जात आहे.


डाळिंब फळबागा धोक्यात : डाळिंब फळबागांमध्ये फुलगळ आणि फळगळ या समस्या अवकाळी पावसाने वाढल्या आहेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे डाळिंब भागांमधील फुलगळ होताना दिसत आहे. तर जे शेतकरी उशिरा बहार धरणार होते त्या बागांनी आताच केन फेकून दिली आहे. यामुळे बहार व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या आहेत.


अवकाळी पावसामुळे शेतात तण उगवले असल्याने ऊन पडल्यावर त्याचा नायनाट करण्यासाठी दुसऱ्यांदा मशागत करावी लागत आहे. तणनाशक मारण्याऐवजी मशागतीने तण घालवणे योग्य असते.


- अशोक आहेर, देवळा

Comments
Add Comment

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या

Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना परफ्यूम कारखान्यावर FDA चा छापा, 54 लाखांचा साठा जप्त

Nashik : नाशिकमध्ये विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला आणखी 300 कोटींचा निधी मिळणार ? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

Nashik Simhastha Kumbh Mela 2027 : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रस्ते विकासासाठी आणखी २५० ते ३०० कोटी

Nashik Police Transfer : नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल ! आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Nashik Police Transfer : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने आठ पोलिस

Nashik Crime : बोरं तोडण्यावरून शेतकऱ्याचा संताप अनावर ! दोन अल्पवयीन मुलींना मारहाण, संशयित ताब्यात

मालेगाव : शेतातील झाडावरून अवघी तीन-चार बोरं तोडून खाल्ल्याच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलींना शिवीगाळ करत

CATS Nashik : युद्धतंत्र बदलणार ! आता लष्करी वैमानिक हेलिकॉप्टरसोबत ड्रोनही उडवणार ; नाशिकच्या कॅट्समध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण

CATS Nashik : भविष्यातील युद्धाचे स्वरूप लक्षात घेऊन भारतीय लष्कराने आपल्या आर्मी एव्हिएशन प्रशिक्षण पद्धतीत मोठे बदल