Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला आणखी 300 कोटींचा निधी मिळणार ? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

Nashik Simhastha Kumbh Mela 2027 : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रस्ते विकासासाठी आणखी २५० ते ३०० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. येत्या १ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा मंत्री समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.


याच बैठकीत साधुग्रामच्या भूसंपादनाचा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता आहे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निश्चित करण्यात आलेल्या सूत्रानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी याबाबत माहिती दिली.



२९ रस्त्यांच्या कामांचा मंत्र्यांकडून आढावा


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (२८ नोव्हेंबर) मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. यावेळी सुमारे १,४०० कोटी रुपये खर्चाच्या २९ रस्त्यांच्या कामांचा रस्तानिहाय आढावा घेण्यात आला. तसेच साधुग्रामच्या नियोजनाचे सादरीकरण आयुक्त मनीषा खत्री यांनी केले. साधुग्राममध्ये सेक्टरनिहाय उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांची माहितीही यावेळी देण्यात आली.


साधुग्रामच्या भूसंपादनाचा प्रश्न जवळपास मार्गी लागला असून, शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. पुरंदर विमानतळ भूसंपादनाच्या धर्तीवर मोबदला देण्याचा विचार सुरू असून, शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. (Nashik Kumbhmela)






मार्चपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश


सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली डांबरी रस्त्यांची कामे मार्चपूर्वी, तर काँक्रिटीकरणाची कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले आहेत. शहरातील रस्त्यांच्या कामांना गती देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. सध्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुमारे १,४०० कोटी रुपये खर्चून २९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. याशिवाय काही नवीन रस्त्यांचे प्रस्तावही महापालिकेने प्राधिकरणामार्फत शासनाकडे पाठवले आहेत. या कामांसाठी आणखी २५० ते ३०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.


शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तर महापालिकेचा स्वनिधी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाणार असल्याचे आयुक्त खत्री यांनी स्पष्ट केले.



मखमलाबाद रस्त्याच्या ठेकेदारावर कारवाई होणार


दरम्यान, सिंहस्थ निधीतून मखमलाबाद रस्त्याचे काम करणाऱ्या महालक्ष्मी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संबंधित कंपनीकडून काम अत्यंत संथगतीने सुरू असून, इतर रस्त्यांच्या तुलनेत या कामाची प्रगती खूपच मागे आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून उर्वरित काम अन्य ठेकेदाराकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. तसेच रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या डांबराची उपलब्धता आणि दरवाढीचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.


एकूणच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रस्ते विकास, साधुग्रामचे भूसंपादन आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, १ डिसेंबरच्या मंत्री समितीच्या बैठकीकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Delimitation Bill : डिलिमिटेशनला शरद पवार, एम. के. स्टॅलिन यांचाही पाठिंबा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वागत

Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण ही विधेयके देशाच्या विकासासाठी तसेच लोकशाही अधिक बळकट

Nashik Police Transfer : नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल ! आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Nashik Police Transfer : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने आठ पोलिस

BMC : घाटकोपर, मानखुर्द चेंबूर परिसरातील ०६ अनधिकृत लॉजवर जप्तीची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अनधिकृत व्यवसाय आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. या

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

मुंबईत ५१ दिवसांमध्ये १६,१५३ बॅनरांची फाडाफाडी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या बॅनरबाजांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असून

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या