नीट युजी २०२५ परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट; उत्तरतालिका आणि प्रतिसाद पत्रक लवकरच जाहीर होणार!

नवी दिल्ली : नीट युजी २०२५ परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) लवकरच नीट युजी २०२५ ची तात्पुरती उत्तरतालिका (Answer Key) आणि उमेदवारांचे OMR रिस्पॉन्स शीट्स प्रसिद्ध करणार आहे.


विश्वासार्ह सूत्रांनुसार, ही उत्तरतालिका आणि प्रतिसाद पत्रक २९ मे २०२५ किंवा ३० मे २०२५ रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.


उमेदवारांनी neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून आपले प्रतिसाद पत्रक डाउनलोड करता येईल. याशिवाय, NTA उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरही स्कॅन केलेले प्रतिसाद पत्रक पाठवणार आहे.


उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना विशिष्ट कालावधीत हरकती नोंदवता येतील, यानंतर अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर केला जाईल.


नीटच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा आणि आपल्या पुढील टप्प्याची तयारी सुरू ठेवा.



एनटीए मार्किंग स्कीम :


नीट युजी २०२५ मध्ये नकारात्मक गुणदान असेल. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण दिले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण कापला जाईल.
अनुत्तरित प्रश्नांसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत किंवा कापले जाणार नाहीत. एकूण गुण ७२० असतील.



निकाल तारीख :


नीट राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (पदवीपूर्व) २०२५ चा निकाल १४ जून २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवार neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आपले निकाल पाहू शकतील.



उत्तरतालिका:


तात्पुरती उत्तरतालिका लवकरच (मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात) प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांना तात्पुरत्या उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी २ ते ३ दिवसांची मुदत दिली जाईल. यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी शुल्क आकारले जाईल. आक्षेपांचे परीक्षण केल्यानंतर, अंतिम उत्तरतालिका जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाईल आणि या आधारावर निकाल तयार केला जाईल. अंतिम उत्तरतालिकेला आव्हान देता येणार नाही.


हे लक्षात ठेवा: या तारखा अंदाजित आहेत आणि एनटीए च्या अधिकृत घोषणेनुसार यात बदल होऊ शकतो. नवीनतम अपडेट्ससाठी एनटीए च्या अधिकृत वेबसाइटला (neet.nta.nic.in) भेट देत राहा.

Comments
Add Comment

Gold Rate : सोनं खरेदीची संधी की आणखी दरवाढीची प्रतीक्षा? डिसेंबरमध्ये मोठा उलटफेर शक्य!

Gold Rate : दिवाळी नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा

रीलच्या नादात चालती बस सोडून खाली उतरला ड्रायव्हर; प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा VIDEO व्हायरल!

Bus Driver Reel : सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि लाइक्स-व्ह्यूजच्या नादात लोक आता स्वतःचाच नव्हे तर

Piyush Goyal Kattappa remark : ‘कट्टप्पांसारख्या जगात भारतच तुमचा विश्वासू सोबती’; पियुष गोयल यांचे जागतिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचे मोठे आवाहन

विशाखापट्टनम : सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायामध्ये 'विश्वास' ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट बनली आहे.

Rajnath Singh : संरक्षण दलांनी आक्रमण आणि बचावासाठी सज्ज राहावे; शत्रूला अनपेक्षित धक्का देण्याची क्षमता विकसित करा

नवी दिल्ली : आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप आणि वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान लक्षात घेता भारतीय संरक्षण दलांनी

Free Bus Service in Delhi: दिल्लीतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत मोफत बस सेवा; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Free Bus Service in Delhi: हिवाळ्याला सुरुवात झाली असून राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण आणि धुरक्याची पातळी यात वाढ झाली आहे.

Delhi Museum: सत्तेची केंद्रे आता संस्कृतीचे वैभव मिरवणार! नॉर्थ-साऊथ ब्लॉकमध्ये उभारणार जगातील सर्वात मोठे संग्रहालय

नवी दिल्लीच्या ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक इमारती आता एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्या आहेत. सरकारी कार्यालये