Free Bus Service in Delhi: दिल्लीतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत मोफत बस सेवा; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

वाहनांमुळे तयार होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी, दिल्ली सरकार एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत सर्व प्रवाशांसाठी मोफत बस सेवा लागू करण्यावर सरकार लवकरच यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Free Bus Service in Delhi: हिवाळ्याला सुरुवात झाली असून राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण आणि धुरक्याची पातळी यात वाढ झाली आहे. त्यामुळे ही गंभीर चिंता निर्माण झाली आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी धुक्याच्या दाट थरामुळे लोकांना श्वास घेणे आणि फिरणे कठीण होत आहे. तसेच रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा विषारी धूर आणि बांधकाम कामांमुळे उडणारी धूळ रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. तसेच रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा विषारी धूर आणि बांधकाम कामांमुळे उडणारी धूळ हे रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. वाहनांमुळे तयार होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी, दिल्ली सरकार एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत सर्व प्रवाशांसाठी मोफत बस सेवा लागू करण्यावर सरकार लवकरच यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.


तीन महिन्यांची मोफत बस योजना राबवल्यामुळे सरकारच्या महसुलावर सुमारे 200कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल, ज्याची भरपाई इतर बाबींमधून केली जाऊ शकते. दक्षिण दिल्लीचे खासदार रामवीर सिंग बिधुरी यांचे असे म्हणणे आहे की, दिल्लीतील सर्व प्रमुख मार्ग आणि निवासी भागांत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार करणे गरजेचे आहे. सध्या, दिल्लीच्या बस ताफ्यात अंदाजे 6988 ई-बसेस आहेत. ज्यामध्ये 1750 सीएनजी बसेसचा समावेश आहे. तर 2028-29 पर्यंत हा ताफा अंदाजे 14,000 ई-बसेसपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच इलेक्ट्रिक बसेसच्या संख्या वाढवण्यावर देखील विशेष भर दिला जाणार आहे.



बसची उपलब्धता जर वाढली आणि प्रवास विनामूल्य केल्यास लोक खाजगी कार आणि दुचाकींऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देतील. ज्यामुळे रस्त्यांवरील गर्दी आणि प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच प्रदूषणाचा सामना करण्यासाठी केवळ बस सेवा मोफत करणे पुरेसे ठरणार नाही. तर असोसिएशन ऑफ एन्व्हायर्नमेंटल प्रोफेशनल्स (AEP) च्या महासचिव डॉ. शालिनी गुप्ता यांनीही या दिशेने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, हिवाळ्यात वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे आणि तापमान घटत असल्यामुळे, प्रदूषक घटक वातावरणात जमिनीजवळ जमा होऊ लागतात.


तसेच यावेळी, वाहनांमधून निर्माण होणारे उत्सर्जन वायू प्रदूषण वाढविण्यात मोठी भूमिका बजावते. त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी करून नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान मोफत बस सेवा सुरू करावी. यासोबतच, दिल्ली मेट्रोच्या भाड्यावर विशेष सवलतीही दिल्या पाहिजेत, जेणेकरून अधिकाधिक लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील.


दररोज मोठ्या संख्येने खाजगी वाहने गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि नोएडासारख्या एनसीआर शहरांमधून दिल्लीत येथे प्रवेश करतात. हे टाळण्यासाठी, दिल्लीच्या सीमेवर तात्पुरत्या पार्किंग सुविधा विकसित केल्या पाहिजेत, जिथे लोक आपली वाहने उभी करू शकतील, आणि दिल्लीमध्ये प्रवास करण्यासाठी पुरेशा ई-बस उपलब्ध कराव्या. सध्या या पार्श्वभूमीवर, दिल्लीच्या सीमेवर बीएस-४ वाहने थांबवली जात आहेत, तसेच रस्त्यांवर पाणी शिंपडले जात आहे. तरी, खाजगी वाहनांचा दबाव आणि वाहतूक कोंडी कायम आहे.

Comments
Add Comment

Delhi Museum: सत्तेची केंद्रे आता संस्कृतीचे वैभव मिरवणार! नॉर्थ-साऊथ ब्लॉकमध्ये उभारणार जगातील सर्वात मोठे संग्रहालय

नवी दिल्लीच्या ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक इमारती आता एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्या आहेत. सरकारी कार्यालये

RBI Rules News :आता तुम्ही बँक खात्याशिवाय पैशांची देवाणघेवाण करू शकता, RBI चा 'हा' नवीन नियम तुम्हाला माहित आहे का?

RBI Rules News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशांतर्गत मनी ट्रान्सफर (DMT) बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या

PM Narendra Modi : 'तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होणार आहात...'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला तो रंजक किस्सा, जेव्हा पत्रकारानं दिली होती आनंदाची बातमी

ना फुलं, ना रंगोळीचे रंग; चक्क सोन्याचे दागिने अन् हिऱ्यांनी सजली रांगोळी ! नेटकरीही थक्क

दुबई : सध्या सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना दागिने खरेदी करणं कठीण झालं आहे. अगदी छोटासा

अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेनंतर लग्नाची परवानगी, सुधारित अग्निपथ योजनेत मोठा बदल

सशस्त्र दलांमध्ये सेवा देणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकारने सुधारित अग्निपथ योजनेत महत्त्वाचा बदल केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, बेपत्ता झालेल्या दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन स्पेशल