पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणात एनआयएकडून ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी छापे

नवी दिल्ली : पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणाचा तपास अधिक तीव्र होत असून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने आज सकाळपासूनच दिल्ली, महाराष्ट्र (मुंबई), हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एकाचवेळी पंधरा ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापेमारी केली आहे.


या छाप्यांचे लक्ष्य PIO (Person of Indian Origin) शी संबंधित संशयित लोक आणि त्यांच्या मालमत्ता होत्या. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यांमध्ये मोबाईल, लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह, संवेदनशील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रं आणि आक्षेपार्ह डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले आहे.



हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश


एनआयएच्या मते, हे संशयित पाकिस्तानस्थित व्यक्तींशी संपर्कात होते आणि भारतात हेरगिरी कारवायांसाठी आर्थिक मदतीचे माध्यम म्हणून काम करत होते. या संशयितांनी २०२३ पासून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली असल्याचा संशय आहे. या प्रकरणात आधीच एक आरोपी अटकेत आहे, आणि त्याच्यापासून मिळालेल्या माहितीनंतर २० मे रोजी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


हा गुन्हा भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ६१(२), १४७, १४८, अधिकृत गुप्तता कायदा १९२३ च्या कलम ३ आणि ५ आणि UAPA कायदा १९६७ च्या कलम १८ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.



CRPF जवान आणि युट्यूबर अटकेत


या तपासाच्या दरम्यान दिल्लीतून CRPF चा जवान मोतीराम जाट याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानला सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाठवण्याचा आरोप आहे. या बदल्यात त्याला आर्थिक मोबदला मिळत होता, अशी माहिती समोर आली आहे.


दुसरीकडे, हरियाणामधील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला देखील अटक करण्यात आली आहे. तिच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीवरून ती पाकिस्तानच्या युट्यूबर झिशान हुसेनसोबत सतत संपर्कात होती, आणि भारतविरोधी छुपं प्रचार सुरू होता. ती धार्मिक व्हिसावर पाकिस्तानमध्ये गेली होती आणि तिने झिशानला मेसेजही केला होता, हे पुरावे आता एनआयएकडे आहेत.


‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानविरुद्धची कारवाई जोरात सुरू आहे. आता केवळ सीमेवर नाही, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेलाही धोका निर्माण करणाऱ्या हेरगिरीच्या रॅकेटवर NIA ने मोठा हातोडा मारला आहे. एकाचवेळी अनेक राज्यांमध्ये छापे टाकून संशयितांना अटक केल्याने हे प्रकरण अजूनच गंभीर बनले आहे. पुढील तपासात अजून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Gold Rate : सोनं खरेदीची संधी की आणखी दरवाढीची प्रतीक्षा? डिसेंबरमध्ये मोठा उलटफेर शक्य!

Gold Rate : दिवाळी नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा

रीलच्या नादात चालती बस सोडून खाली उतरला ड्रायव्हर; प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा VIDEO व्हायरल!

Bus Driver Reel : सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि लाइक्स-व्ह्यूजच्या नादात लोक आता स्वतःचाच नव्हे तर

Piyush Goyal Kattappa remark : ‘कट्टप्पांसारख्या जगात भारतच तुमचा विश्वासू सोबती’; पियुष गोयल यांचे जागतिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचे मोठे आवाहन

विशाखापट्टनम : सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायामध्ये 'विश्वास' ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट बनली आहे.

Rajnath Singh : संरक्षण दलांनी आक्रमण आणि बचावासाठी सज्ज राहावे; शत्रूला अनपेक्षित धक्का देण्याची क्षमता विकसित करा

नवी दिल्ली : आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप आणि वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान लक्षात घेता भारतीय संरक्षण दलांनी

Free Bus Service in Delhi: दिल्लीतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत मोफत बस सेवा; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Free Bus Service in Delhi: हिवाळ्याला सुरुवात झाली असून राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण आणि धुरक्याची पातळी यात वाढ झाली आहे.

Delhi Museum: सत्तेची केंद्रे आता संस्कृतीचे वैभव मिरवणार! नॉर्थ-साऊथ ब्लॉकमध्ये उभारणार जगातील सर्वात मोठे संग्रहालय

नवी दिल्लीच्या ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक इमारती आता एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्या आहेत. सरकारी कार्यालये