ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांची पर्यावरण प्रबोधनाची वारी; कीर्तनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा जागर!

मुंबई : कीर्तनातून रंजन करता-करता डोळ्यांत अंजन घालण्याची किमया कीर्तनकार पार पाडीत असतात. आपल्या कृतीतून, वाणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचं काम सातत्याने कीर्तनकार करीत असतात.


ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे बारामती, पुणे इथल्या इंग्रजी माध्यमात शिक्षिका म्हणून काम करीत असतानाच महिला कीर्तनकार म्हणून नावारूपाला आल्या. अध्यात्माचा आणि पर्यावरणाचा सुवर्णमध्य साधून ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांचा चालू असलेला प्रवास अविश्वसनीय आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना पर्यावरणासाठी काही तरी करावं, या उद्देशानं त्या ज्या-ज्या खेडेगावात कीर्तनासाठी जातात तिथं-तिथं एक रोप लावत आणि त्या रोपाची काळजी घेण्याची जबाबदारी तिथल्या गावकऱ्यांवर सोपवतात. पुन्हा त्याच ठिकाणाहून कीर्तनाचं निमंत्रण आल्यावर दिलेल्या रोपाची योग्य ती निगराणी राखली जाते का, त्याची काळजी घेतली जाते का... हे पाहूनच त्या कीर्तनाला होकार किंवा नकार देतात.


आपल्या या कृतीतून पर्यावरण शिक्षणाची एक चळवळ त्यांनी निर्माण केली आहे. 'आजूबाजूला अनेक नकारात्‍मक गोष्‍टी घडत असल्‍या तरी त्‍यांतील सकारात्‍मक बाबींवर लक्ष केंद्रित करून त्‍यांना प्रकाशझोतात आणण्‍याचं काम मला महत्त्वाचं वाटतं, ' असं ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे म्हणतात.



'माझ्या कीर्तनातून समाजाला आदर्शांकडे नेण्याचा माझा प्रयत्न आहे.' असं त्या सांगतात. परिवर्तनाचा प्रयत्न करत आपल्या धरणीमातेला, निसर्गाला, पर्यावरणाला समृद्ध करण्याचा त्यांचा संकल्प त्यांना वेगळं ठरवतो.


येत्या ५ जूनला ‘पर्यावरण दिन’ आहे. या दिनाचं औचित्य साधत त्यांच्या कीर्तन सादरीकरणाचा विशेष भाग 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये रंगणार आहे. या शोमध्ये ह. भ. प. अश्विनी महाराज टाव्हरे आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकतील.


'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवार, सकाळी ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवरून प्रसारित होत आहे.

Comments
Add Comment

Maatrubhumi: सलमानच्या 'मातृभूमी'मधील 5 संवाद प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झाले

Maatrubhumi: बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये

Kavya Maran In Laws: काव्या मारनच्या सासरची श्रीमंती किती? सासरे अभिनेते, तर सासू आहेत प्रसिद्ध नृत्यांगना!

काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाची सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. काव्या

Marathi Entertainment News: प्रवीण तरडेंसाठी सुबोध भावेंची खास आठवण; जुन्या फोटोसोबत नव्या नाटकाची घोषणा!

मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकारांच्या मैत्रीचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. काही कलाकारांची मैत्री

Ramayana Box Office Collection: सात दिवसांत 'रामायण'ची 934 कोटींची कमाई! रणबीर कपूरचा चित्रपट 1000 कोटींच्या दिशेने

सध्या चित्रपटसृष्टीत रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय महाकाव्य रामायणावर

Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे पहिली पत्नी

Avinash Arun Second Marriage: नुकताच ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ (Prahaar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे

Kiara Advani News: ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सवर सिद्धार्थची प्रतिक्रिया; कियाराने केला खुलासा!

‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कियारा अडवाणी अभिनेता यशसोबत