सिक्कीम भूस्खलन : भारतीय लष्कराने ११३ पर्यटकांचा वाचवला जीव

गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब हवामान आणि खडतर भूभागातून पायीच वाट काढत लाचेन गाव गाठले आणि तिथे अडकलेल्या ११३ पर्यटकांना शोधून काढले. त्यातील ३३ जणांना विमानाने बाहेर काढण्यात आले असून यामध्ये काही परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने बुधवारी(दि.४) दिली.


याबाबत संरक्षण मंत्रालयाने आज(दि.४) माहिती दिली की, उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या विनाशकारी भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य धोकादायक भूभागात नागरिकांचा शोध आणि बचाव कार्य करत आहे. पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावात पायीच लष्कर पोहोचले आहे, तिथे ११३ अडकलेले पर्यटक सापडले. त्यापैकी ३० जणांना काल विमानाने बाहेर काढले आहे. भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार एमआय-१७ हेलिकॉप्टरने मदत आणि आपत्ती निवारण मोहिमा सुरू केली आहे. मदत साहित्य टाकण्यात आले आहे. या परिसरात एनडीआरएफ पथके दाखल झाली आहेत. दुर्गम चाटेन प्रदेशातून दोन अमेरिकन नागरिकांसह ३३ अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले.



सिक्कीममध्ये झालेल्या मोठ्या भूस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या लेफ्टनंट कर्नलसह ६ जणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही, असे लष्कराने बुधवारी सांगितले. रविवारी रात्री उत्तर सिक्कीममधील चाटेन येथील लष्करी छावणीच्या ठिकाणी भूस्खलन झाले. ६ जणांना शोधण्यासाठी तातडीने शोध मोहीम सुरू आहे. बेपत्ता व्यक्तींमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रितपाल सिंग संधू, सुभेदार धर्मवीर, नाईक सुनीलाल मुचाहरी, शिपाई सैनुधीन पीके, स्क्वाड्रन लीडर आरती संधू (निवृत्त), लेफ्टनंट कर्नल संधू यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी मिस अमायरा संधू यांचा समावेश आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.


रविवारी(दि. १) संध्याकाळी ७ वाजता सिक्कीममधील लाचेन जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या भूस्खलनात भारतीय लष्कराच्या एका छावणीलाही फटका बसला. लष्कराने तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या भूस्खलनात १३ सैनिक आणि अनेक नागरिक अडकले. लष्कराच्या बचाव पथकाने ७ जणांना वाचवले, तर ६ जण बेपत्ता असून अद्याप शोध सुरु आहे.

Comments
Add Comment

Gold Rate : सोनं खरेदीची संधी की आणखी दरवाढीची प्रतीक्षा? डिसेंबरमध्ये मोठा उलटफेर शक्य!

Gold Rate : दिवाळी नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा

रीलच्या नादात चालती बस सोडून खाली उतरला ड्रायव्हर; प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा VIDEO व्हायरल!

Bus Driver Reel : सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि लाइक्स-व्ह्यूजच्या नादात लोक आता स्वतःचाच नव्हे तर

Piyush Goyal Kattappa remark : ‘कट्टप्पांसारख्या जगात भारतच तुमचा विश्वासू सोबती’; पियुष गोयल यांचे जागतिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचे मोठे आवाहन

विशाखापट्टनम : सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायामध्ये 'विश्वास' ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट बनली आहे.

Rajnath Singh : संरक्षण दलांनी आक्रमण आणि बचावासाठी सज्ज राहावे; शत्रूला अनपेक्षित धक्का देण्याची क्षमता विकसित करा

नवी दिल्ली : आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप आणि वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान लक्षात घेता भारतीय संरक्षण दलांनी

Free Bus Service in Delhi: दिल्लीतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत मोफत बस सेवा; सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Free Bus Service in Delhi: हिवाळ्याला सुरुवात झाली असून राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण आणि धुरक्याची पातळी यात वाढ झाली आहे.

Delhi Museum: सत्तेची केंद्रे आता संस्कृतीचे वैभव मिरवणार! नॉर्थ-साऊथ ब्लॉकमध्ये उभारणार जगातील सर्वात मोठे संग्रहालय

नवी दिल्लीच्या ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक इमारती आता एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्या आहेत. सरकारी कार्यालये