Nashik Car Accident : नाशिकमध्ये भरधाव कार शिरली थेट बंगल्यात; ५ जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कळवण-नाशिक मार्गावर आज भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यात घुसल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. बुधवारी रात्री १० वाजता हा कार अपघात झाला. या अपघातात नामपूर आणि देवळा येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला. तर २ जण गंभीर जखमी झाले.



चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले


प्राथमिक माहितीनुसार, नामपूर येथील भदाण कुटुंबियांच्या नातेवाईकाचे नाशिकमध्ये लग्न होते. त्यासाठी भदाण आणि मेतकर कुटुंबिय नाशिकला आले होते. लग्नानंतर हे सर्व जण कारमधून सटाण्याकडे निघाले होते. नाशिक-कळवण महामार्गावर कोल्हापूर फाटा आला तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यात घुसवली. ही कार बंगल्यात जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून बंगल्याचाही काही भाग कोसळला आहे. बंगल्याबाहेरील असलेला सिमेंट खांब वाकून कार आत घुसली. त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे समोर येते.



या अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. तर जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न

Cm Devendra Fadanvis News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! चारा परराज्यात पाठविण्यास बंदी...

मुंबई: राज्यातील चारा परराज्यात पाठवण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून, चाऱ्याचा वापर बायोफ्युएल किंवा

Central Railway Megablock: मुंबईकरांचे मेगाहाल होणार! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; वाचा सविस्तर

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि सुरक्षेची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी येत्या

Diva Station Megablock: दिवा स्थानकावर विशेष ब्लॉक, दोन एक्स्प्रेसला बसणार फटका; बाकीच्या गाड्यांचं शेड्युल्ड काय?

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही रात्रीच्या वेळी प्रवास करणार आहात, तर ही

Vande Bharat Sleeper: रात्री वाराणसीला शांत झोपायचं अन् सकाळी दिल्लीत उठायचं! वंदे भारत स्लीपरचं पाहा संपूर्ण शेड्युल

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून 'नाईट ट्रेन'ची घोषणा करण्यात आली होती. ही एक्स्प्रेस

Western Railway Megablock: वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक; वाचा अपडेट...

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गिकेवर दिवसकालीन मेगाब्लॉक न