पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. नंतर पंतप्रधान मोदींनी चिनाब पुलाची पाहणी केली. यानंतर त्यांनी अंजी पुलाचा दौरा करून उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी नंतर कटरा येथे ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन केले. पूर्ण झालेले प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.


नदीपासून ३५९ मीटर उंचीवर वसलेला एक वास्तुशास्त्रीय चमत्कार, चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे कमान पूल आहे. हा १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे. हा १,३१५ मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे, जो पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. हा पूल भूकंप आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यासाठी डिझाइन केला आहे. हा पूल २६० किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या वाऱ्यात आणि भूकंपांच्या धक्क्यातही स्थिर राहू शकतो. पुलाच्या बांधकामात ३०,००० टन स्टील वापरले आहे. पुलाचा पाया अर्ध्या फुटबॉल मैदानाइतका रुंद आहे. या पुलाचे आयुष्य १२० वर्षे असून त्यावरून ताशी १०० किलोमीटर वेगाने ट्रेन धावू शकते.


चिनाब पूल रिश्टर स्केलवर ८ रिश्टर स्केलपर्यंतचे भूकंप सहन करू शकतो. तो ४० टन टीएनटी इतक्या तीव्रतेच्या स्फोटांनाही तोंड देऊ शकतो. या पुलाचा मोठा परिणाम जम्मू आणि श्रीनगरमधील संपर्क वाढवण्यास होणार आहे. पुलावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनने, कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी सुमारे ३ तास लागतील, सध्याचा प्रवास वेळ २-३ तासांनी कमी होईल.


उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पही पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केला. सुमारे ४३,७८० कोटी रुपये खर्चाच्या २७२ किमी लांबीच्या USBRL प्रकल्पात ३६ बोगदे (११९ किमी लांबीचे) आणि ९४३ पूल समाविष्ट आहेत.


https://www.facebook.com/share/r/15N5gQsrJ7/

 

वंदे भारत ट्रेन सेवा


वंदे भारत ट्रेनमध्ये चेअर कारचे भाडे ₹७१५, एक्झिक्युटिव्ह क्लास (EC): ₹१३२० असेल. या ट्रेनमध्ये अँटी-फ्रीझिंग तंत्रज्ञान आहे - शून्यापेक्षा कमी स्थितीत हीटिंग सिस्टम, ३६० अंश फिरणाऱ्या सीट्स, यूएसबी चार्जिंग पॉइंट, शुद्ध शाकाहारी जेवणासह स्थानिक जेवण या सोयी असतील. वंदे भारत ट्रेन सेवा ७ जूनपासून सामान्य प्रवाशांसाठी सुरू होईल. वंदे भारत ट्रेन कटरा ते श्रीनगर दरम्यान दिवसातून चार वेळा धावणार आहे. सध्या त्यांचा एकमेव मुक्काम बनिहालमध्ये असेल. यात चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास अशा दोन्ही श्रेणी असतील आणि प्रवाशांना काही स्थानिक खाद्यपदार्थांसह शाकाहारी जेवण दिले जाईल.


Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा