गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी अतिरिक्त आरक्षण खिडक्या

प्रवासी संघटनेने खा. नरेश म्हस्के यांचे मानले आभार


ठाणे : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के दिली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानले आहेत.


नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लोखो कोकणवासिय ठाणे, मुंबई आणि उपनगरांत स्थायिक झाले आहेत. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच. गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येतात. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले ४ वर्ष लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागला आहे.


खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे ७ मे २०२५ रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत २ जून २०२५ रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे २ अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरु करत असल्याची माहिती दिली आहे. २० जून २०२५ ते ५ जुलै २०२५ या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु राहणार आहेत. सध्या ४ आरक्षण खिडक्या कार्यरत असून २ अतिरिक्त खिडक्या सुरु होणार आहेत. ६ आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन