Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार खेळाडू विराट कोहली विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता.


याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध बेंगळुरूमधील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. त्याच प्रकरणाच्या चौकशीत वेंकटेश यांची तक्रार समाविष्ट केली जाईल.


बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी आज, शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूचे (आरसीबी) मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे याच्‍यासह अन्‍य तिघांना अटक केली. ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए नेटवर्क्सशी संबंधित आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए)चे सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांच्याही घरी पोलिसांनी धडक दिली. मात्र ते घरी नव्‍हते.


निखिल सोसाळे हे विमानाने मुंबईला जाण्‍याच्‍या तयारीत होते. त्‍यांना बंगळूरु विमानतळावर अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू आहे. डीएनएचे इतर 3 कर्मचारी किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना क्यूबन पार्क पोलिस ठाण्यात आणले, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे. चेंगराचेंगरीत निष्काळजीपणाचे कारण, नियम, कार्यक्रमाची परवानगी आणि सुरक्षा मानकांशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम