BMC: महापालिकेच्या वतीने सुमारे २० हजार कोटींचा वातावरणीय अर्थसंकल्प

यंदा बेस्टचा समावेश, भविष्यात इतर प्राधिकरणे आणि मंडळांचाही होणार विचार


मुंबई (खास प्रतिनिधी) : पर्यावरण संरक्षणासाठी मुंबई महापालिकेकडून २० हजार कोटी रुपयांचा 'वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल २०२५-२६' प्रकाशित करण्यात आला आहे. वातावरणीय अर्थसंकल्प २०२५-२६ साठी महापालिका तसेच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) यांच्याकडून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भांडवली खर्चासाठी १७,०६६.१२ कोटी व महसुली खर्चासाठी ३,२६८.९७ कोटी रुपये अशाप्रकारे २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


यंदाच्या वर्षी बेस्ट उपक्रमाचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला असून येत्या वर्षांमध्ये एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा तसेच विविध प्राधिकरणे, मंडळांचा समावेश होष्णार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेचा 'वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल २०२५-२६' गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात आयोजित प्रकाशन सोहळ्यास उपायुक्त राजेश ताम्हाणे, प्रमुख अभियंता अविनाश काटे, प्रमुख अभियंता प्रचिती देसाई, प्रादेशिक नागरी व पर्यावरण अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. अजित साळवी उपस्थित होते. डॉ. अश्विनी जोशी पुढे म्हणाल्या की, एकल वापराच्या प्लास्टिकचा सर्वाधिक परिणाम मुंचई महापालिकेला सहन करावा लागतो आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करताना नाल्यांतून गाळपिक्षा कितीतरी जास्त प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत.



जागतिक स्तरावर मुंबई चौथे शहर


मुंबईचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी विविध प्रकल्पांच्या बांधकामाच्या ठिकाणी किंवा इमारतीभोवती विविध रंगसंगतीच्या ताडपत्रीचा वापर करायला हवा. हवामान बदलामुळे होत असलेल्या शहराच्या उष्णतावाढीसंदर्भांतील उपाययोजनासाठी पर्यावरण व वातावरणीय वदल विभाग प्रयत्नरत आहे. यासाठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांनी विविध रंगसंगतीपूर्ण छत किंवा आच्छादनांशी संबंधित नवनवीन संकल्पना समोर आणाव्यात, असेही डॉ. जोशी म्हणाल्या. यंदा या अर्थसंकल्प अहवालाचे दुसरे वर्ष आहे. वातावरणीय अर्थसंकल्प तयार करण्याबाबत जागतिक स्तरावर हाती घेण्यात आलेल्या सी-४० शहरे या उपक्रमांचा मुंबईसुद्धा एक भाग आहे. यापूर्वी ऑस्लो, लंडन आणि न्यूयॉर्क या शहराशी संबंधित प्रशासनाकडून वातावरण अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अशा प्रकारचा अहवाल प्रकाशित करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील आता चौथे शहर बनले आहे.



वातावरणीय अर्थसंकल्प २०२५-२६ ची ठळक वैशिष्ट्ये


वातावरणीय अर्थसंकल्प २०२५-२६ साठी बृहन्मुंबई महापालिका, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भांडवली खर्चासाठी १७,०६६.१२ कोटी आणि महसुली खर्चासाठी ३.२६८.९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबई महापालिकेच्या ४३,१६२.२३ कोटी रुपयांच्या भांडवली अर्थसंकल्पीय अंदाजापैकी १६.३२१.३३ कोटी रुपयांची तरतूद ही वातावरण अनुकूल बाबींशी संलग्नित आहे. २०२४-२५ च्या तुलनेत यदा ही तरतूद वाढवून ५९.६४ टक्के करण्यात आली आहे. सात नवीन विभागांच्या वातावरण-अनुकूल खर्चाचा समावेश, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचा वाढलेला अर्थसंकल्प व बृहन्मुंबई महापालिकेच्या २० मूळ विभागांच्या नवीन उपक्रमामुळे ही वाढ झाली आहे.


आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महसुली अर्थसंकल्पात वातावरण अनुकूलतेच्या आनुषंगाने ५.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नियोजन विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वातावरण अनुकूल उपक्रमांचा समावेश आहे. मुंबई वातावरण कृती आराखड्याशी सबंधित इतर भांडवली कागासाठी (उदा., बांधकामविषयक मोठ्या प्रकल्पांमध्ये समाविष्ट पर्जन्य जलसंचयन, मलनिस्सारण प्रक्रिया इत्यादीसारखे घटक आदींसाठी) २०२४-२५ मध्ये २,१६३.८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, वी २०२५-२६ मध्ये ३,०७४.०८ कोटी रुपये करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २५-२६ साठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने (वेस्ट) १,८४९.२४ कोटी रुपये भांडवली खर्चापैकी ७४४.८ कोटी रुपयाची वातावरण-अनुकूल उपक्रमांसाठी तरतूद केली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने