Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळ्यात सालाबादाप्रमाणे याही वर्षी लावणी आणि लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवर कलावंतांना लावणी गौरव आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्कार


या प्रसंगी शाहीरी परंपरेतील जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत, तर लावण्यवती प्रज्ञा कोळी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, गायिका वंदना निकाळे, पुरुष लावणी कलाकार आनंद साटम, निर्माते उदय साटम, वादक धीरज गोरेगांवकर, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निवेदक भरत उतेकर, लोककलेसाठी सुनिल ढगे, नेपथ्य तंत्रज्ञ म्हणून सुनील देवळेकर या कलाकारांना लावणी गौरव २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. किरण डांगे आणि सुजाता कांबळे-डांगे या कलाकार दांपत्याचा राजाराणी - २०२५ या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

तसेच सदर सोहळ्यात कलाकारांच्या इयत्ता दहावी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. सोबत महासंघाच्यावतीने आयोजित नवरात्र सोहळ्यातील नवरंग स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे. सदर सोहळ्यात मुंबईतील नामवंत कलाकारांच्यावतीने दिमाखदार नृत्यविष्कारासह सांगितिक कार्यक्रम सुद्धा सादर होणार आहे, असे अध्यक्षा कविता घडशी यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Ramayana Box Office Collection: सात दिवसांत 'रामायण'ची 934 कोटींची कमाई! रणबीर कपूरचा चित्रपट 1000 कोटींच्या दिशेने

सध्या चित्रपटसृष्टीत रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय महाकाव्य रामायणावर

Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे पहिली पत्नी

Avinash Arun Second Marriage: नुकताच ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ (Prahaar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे

Kiara Advani News: ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सवर सिद्धार्थची प्रतिक्रिया; कियाराने केला खुलासा!

‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कियारा अडवाणी अभिनेता यशसोबत

Aamir Khan Productions : आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची एकत्रित झेप; भव्य मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी सज्ज!

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंट एकत्र येणार डिजिटल मनोरंजन क्षेत्रात नव्या मायक्रोड्रामा

O Saathi Re Web Series: इम्तियाज अली,अदिती राव यांची 'ओ साथी रे' वेब सिरीज नेटफ्लिक्सवर 'या' दिवशी प्रदर्शित

O Saathi Re Web Series: चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांची एक नवीन वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पडद्यावर

Anirudh Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याच लग्न थाटामाटात पार पडलं, ग्रीसमधील लग्नाचे फोटो आले समोर

[caption id="attachment_1074372" align="alignnone" width="800"] 1. अखेर अनिरुद्ध-काव्या विवाहबंधनात!प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन