व्याजदर कपातीमुळे शेअर बाजार तेजीत...

डॉ. सर्वेश सुहास सोमण


गेल्या अनेक दिवस तेजीत असणारा भारतीय शेअर बाजार या आठवड्यात देखील सकारात्मक बंद झाला. या आठवड्यात सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते द्वैमासिक पतधोरणाकडे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी सकाळी १० वाजता रेपो रेट जाहीर केले. त्यानुसार, सलग तिसऱ्यावेळी व्याजदरात कपात केली. ५६ महिन्यानंतर ही तिसरी कपात दिसून आली. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जासह इतर कर्जावरील व्याजदरात मोठी कपात झाली. त्याचा फायदा आता रिअल इस्टेट आणि वाहन बाजाराला होईल. गेल्या काही दिवसांपासून हे क्षेत्र मंदीशी सामना करत होते. शुक्रवारी रिझर्व बँकेने आपले द्विमासिक पतधोरण जाहीर केले. रिझर्व बँक पतधोरण निश्चिती समितीने “रेपो दरात”०.५० टक्क्यांची कपात केली. तो आता ५.५ टक्क्यावर आला आहे.


मी यापूर्वीच्या मागील पतधोरणानंतरच्या लेखात रेपो दर, रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय हे सांगितलेले होते. रिझर्व बँक ही बँकांना जे कर्ज देते आणि त्या दिलेल्या कर्जावर जे व्याजदर लावले जातात त्याला “रेपो दर” असे म्हणतात. बँका रिझर्व बँकेकडे ज्या ठेवी ठेवतात आणि बँकांनी ठेवलेल्या ठेवींवर बँकाना जो परतावा मिळतो त्याला “रिव्हर्स रेपो दर” असे म्हणतात. या पतधोरणानंतर निर्देशांकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामध्ये बँक क्षेत्रातील शेअर्सनी उसळी घेतली.


या गुरुवारच्या सत्रात निर्देशांकात झालेल्या वाढीला बँकानी मोठ्या प्रमाणात हातभार लावला. पतधोरणानंतर बँकनिफ्टी मध्ये देखील मोठी वाढ झाली. सरकारी रोख्यांमध्ये बँकांनी केलेल्या गुंतवणुकीवर दिवसाला रिझर्व बँकेकडून दिला जाणारा व्याजदर म्हणजे “एमएसएफ” अर्थात “मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलीटी” तो ५.७५ टक्के इतका राहिला.


पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांक निफ्टीची दिशा आणि गती तेजीची असून २४७०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत ही तेजी कायम राहील ज्यामध्ये आज २५००० ला असणारा निफ्टी २५१५० ते २५२०० पर्यंत मजल मारणे अपेक्षित आहे. त्यामुळे गती आणि दिशा ओळखून त्यानुसार व्यवहार करणे अपेक्षित आहे.


(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)


samrajyainvestments@gmail.com

Comments
Add Comment

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने-चांदी स्वस्त ! दोन दिवसांत चांदीच्या दरात मोठी घसरण

Jalgaon : दसऱ्यानंतर जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरात सुरू झालेली घसरण शुक्रवारीही कायम राहिली.

Gold Silver Rate Today : जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा

जळगाव : दसऱ्यानंतर जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा

Jio IPO Day 2: 22% लिस्टिंग गेनचा धमाकेदार पाऊस! जिओच्या आयपीओने दुसऱ्या दिवशी काढले गुंतवणुकदारांचे लाड, आकडा वाचून थक्क व्हाल

मुंबई : देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा 30,213 कोटी रुपयांचा जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात

शेअर बाजाराला विजयादशमीचा मोठा झटका की कोटींची संधी? जाणून घ्या आज काय सुरू आणि काय बंद

आज विजयादशमीनिमित्त देशवासी एकीकडे दसऱ्याचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करत आहेत, तर दुसरीकडे

आता घरबसल्या अमेरिकेत थेट कमाईची संधी! एंजेल वन घेऊन आली भन्नाट ऑफर, गुगल-ॲपलमध्ये करा पैशाचा पाऊस

मुंबई : भारतीय गुंतवणूकदारांसाठी आता थेट अमेरिकन शेअर बाजारात पैसे गुंतवणे अत्यंत सोपे आणि फायदेशीर झाले आहे.

Stock Market Crash: शेअर बाजारात मोठी घसरण ! गुंतवणूकदारांचे तब्बल 'इतके' कोटी बुडाले, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी पडझड

Stock Market Crash : आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात