Ahmedabad plane crash: सकाळी ८.३० वाजता पंतप्रधान मोदी पोहोचणार अहमदाबादला, अपघातस्थळाची करणार पाहणी

अहमदाबाद: अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाला गुरूवारी अपघात झाला. या अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. एअरलाईनने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये दुजोरा दिला की विमानातील २४२ प्रवासीआणि क्रू मेंबर्सपैकी केवळ एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.


आज सकाळी ८.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे पोहोचतील. पंतप्रधान घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींनाही भेटतील. गुरूवारी अमित शाह यांनी घटनास्थळाचा दौरा केला होता.



विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू


गुरूवारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान क्रॅश झाले आणि मेघानीनगर येथील मेडिकल कॉलेजच्या मेस बिल्डिंगला आदळले. यानंतर अतुल्यम हॉस्टेलला हे विमान आदळले. यामुळे विमानाचे आगीच्या गोळ्यात रुपांतर झाले. चारही बाजूंनी धुराचे लोळ आणि मलबा पसरला होता. एकच हल्लाकल्लोळ झाला.


विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद पोलिसांनी सांगितले की विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयात २६५ मृतदेह आणण्यात आले. मृतांमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.


एक प्रवासी सुखरूप


विमान दुर्घटनेत एक प्रवासी सुखरूप असल्याची बातमी समोर आली आहे. या प्रवाशाचे नाव रमेश विश्वास कुमार आहे. या रुग्णावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?