मोहन्यातील लहुजी नगरात हागणदार मुक्तीला हरताळ

उघड्यावर शौचाला जाण्याची वेळ


कल्याण : कल्याण, डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचा गवागवा केला जात असला तरी मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वासियांना शौचालय सुविधा अभावी उघड्यावर प्रातर्विधी उरकावा लागत असल्याने शासनाच्या हागणदारी मुक्त अभियनाला मनपा क्षेत्रात हरताळ बसल्याचे दिसते.


मोहने येथील लहुजी नगर झोपडपट्टी वजा वसाहतीमध्ये दोन हजारहून अधिक नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उघड्यावर शौच करावयास जावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि घर शौचालय योजनेचा गाजावाजा करणाऱ्या सरकारच्या दाव्यांना लहुजी नगरमधील वस्तुस्थितीने चपराक दिली आहे. कडोंमपाच्या हद्दीत मोहन्यातील लहुजीनगर मधील तब्बल २,५०० नागरिकांचा संभाव्य आरोग्याचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.


स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही कल्याण डोंबिवली सारख्या स्मार्ट शहरात उघड्यावर शौचाला जाण्यास नागरिक मजबूर आहेत. विशेषतः महिला वर्गाची यामुळे होणारी कुचंबणा आणि मानसिक त्रास ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. लहुजी नगर मधील पूर्वीच्या जुन्या शौचालयाची पडझड झाल्याने ते तोडण्यात आले. त्या जागी नवीन शौचालय बांधणे गरजेचे होते. परंतु शौचलय बांधण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, यापूर्वी सुलभ शौचालय दुमजली बांधण्याचे काम इमारत बांधून देखील न्यायालयीन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने अद्याप देखील सुरू होऊ शकले नाही.


लहुजी नगर मधील करदाते नागरिक मनपाला मालमत्ता कर भरतात, त्यांच्या मुलभूत सुविधा पुरविणे मनपाचे काम आहे. कोणच्या दबावामुळे नागरी सोयी सुविधाचा बोजावारा होत आहे, असाही आरोप यानिमित्ताने होत आहे. याबाबत माजी नगरसेवक दया शेट्टी यांनी खासदार सुरेश बाळ मामा म्हात्रे यांची भेट घेतली असून लहुजी नगरच्या शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली आहे. नागरिकांना साधे शौचालय उपलब्ध नसणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे असे दया शेट्टी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Titwala Crime: मालमत्तेच्या वादातून मुलाने केला वडील आणि भावावर गोळीबार, टिटवाळ्यात खळबळ

मालमत्तेच्या वादातून एका तरुणाने स्वतःच्याच वडिलांवर आणि भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्यात

मुंब्रामध्ये 58 किलो भेसळयुक्त तूप जप्त, ठाणे पोलीस आणि FDA अधिकाऱ्यांकडून धडक कारवाई

ठाणे: अन्न- औषध प्रशासनाकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, धाड सत्र टाकून अन्न भेसळ

Thane News: ठाणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय! जिल्ह्यामध्ये रॉकेटसह हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी

ठाणे: ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला

Thane Fire : ठाण्यातील रहेजा गार्डन संकुलात अग्नितांडव; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरू

Thane News: दिवाळीच्या रात्री ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरातील रहेजा कार्लाइन या 17 मजली इमारतीला भीषण आग लागली.

Government Schemes for Tribal Communities: एकाच छताखाली आदिवासींना मिळणार तात्काळ लाभ; न्यायाधीशांच्या उपस्थितीत भरणार शासकीय योजनांचा महामेळावा

Thane: एकाच छताखाली सर्व गरजूंना शासकीय योजनांचा लाभ ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शहापूर येथे मिळणार

Nalasopara Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ग्रँट रोड स्थानकात पतीने लोकलसमोर उडी मारून संपवले जीवन

मुंबईतील ग्रँट रोड रेल्वे स्थानकावर शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक क्रमांक ४ वर एका ५० वर्षीय