Government Schemes for Tribal Communities: एकाच छताखाली आदिवासींना मिळणार तात्काळ लाभ; न्यायाधीशांच्या उपस्थितीत भरणार शासकीय योजनांचा महामेळावा

एकाच छताखाली सर्व गरजूंना शासकीय योजनांचा लाभ ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शहापूर येथे मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासींसह सर्वच गरजू नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांची माहिती मिळावी ह्या उद्देशाने हा महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

Thane: एकाच छताखाली सर्व गरजूंना शासकीय योजनांचा लाभ ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शहापूर येथे मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासींसह सर्वच गरजू नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांची माहिती मिळावी ह्या उद्देशाने हा महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या महामेळाव्यात काही शासकीय योजनांचा थेट लाभ आणि ऑन दी स्पॉट आदिवासी आणि इतर गरजू पात्र नागरिकांना देण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश, जिल्हाधिकारी यांसह सर्वच विभागातील प्रमुख अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.



ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शहरी भागांसह मोठ्या प्रमाणात आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात नागरी वसाहती आहेत.त्यामुळे गरजू नागरिकांसाठी शासनाच्या अनेक योजना असतानाही त्या दुर्गम भागातील नागरिकांना काहीसा विलंब होतो. मात्र आता या योजना जलदगतीने सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने हा पुढाकार घेतला असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गरजू नागरिकांसाठी शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. 28 नोव्हेंबर रोजी शहापूर तालुक्यातील वन विभाग प्रशिक्षण केंद्रात हा महामेळावा भरणार असून त्यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गरजू नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश रवींद्र पाजणकर यांनी, सद्यस्थितीला या महामेळाव्यात विविध योजनांची माहिती आणि थेट लाभ देणारे 50 स्टॉल एकाच छताखाली लावले जाणार असल्याचे सांगितले आहे. मेळावा काही आदिवासी आणि दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेतून मिळणारी मदत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर डी सावंत, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असून या महामेळाव्याला गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही न्या. पाजणकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Ramayana Movie Collection: 4,000कोटींचा ‘रामायण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट? 3 दिवसांची कमाई पाहा

Ramayana Movie Collection: बहुचर्चित नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! अखेर कल्याणमध्ये सुरू होणार 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय', फेऱ्यांचा त्रास संपणार

ठाणे: ठाणे जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि जिल्हा मुख्यालयाचे असलेले लांब अंतर यामुळे कल्याण, उल्हासनगर,

Pm Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची परंपरा कायम! यंदाची दिवाळी सुद्धा सुरक्षा दलातील जवानांसोबत केली साजरी...

नवी दिल्ली: देशभर उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे

Kanpur Hit & Run Case: थार गाडीची स्कूटर चालवणाऱ्या तरुणाला धडक; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

Kanpur Hit & Run Case: उत्तर प्रदेश येथील कानपूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार कारने स्कूटर चालवणाऱ्या एका तरुणाला धडक

पनवेल- वसई थेट लोकल! 12710 कोटींचा प्रस्ताव अन् 17 रेल्वे स्टेशन; कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रामध्ये (MMR) रेल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या आहेत. पनवेल

Farmers Visit: दुष्काळाच्या सावटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीर; शेतकऱ्यांसोबत वनमंत्री गणेश नाईक यांची दिवाळी

ठाणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटाचा सामना करत असताना, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना या कठीण