Monsoon Restriction : सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी पर्यटकांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध

सातारा : पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणा-या नागरीकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता दिनांक २० जून ते १९ ऑगस्ट पर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहे. अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ, व धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परीसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते. त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.




  • पावसामुळे वेगाने वाहणा-या पाण्यात उतरणे व पोहणे.

  • धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.

  • पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे धबधबे, द-यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणेस व कोणत्याही स्वरुपाचे चित्रिकरण करणे.

  • पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.

  • वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.

  • वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल असे वेगाने चालविणे.

  • वाहनांची ने-आण करतांना बेदकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.

  • सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्या उघडयावर इतरत्र फेकणे.

  • सार्वजनिक ठिकाणी येणा-या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

  • सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टम वाजविणे, वाहनातील स्पिकर/उफर मोठ्या आवाजात वाजविणे यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.

  • ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल असे कोणतीही कृती करणे.

  • धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करणे (अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून)

  • सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.