दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार विक्रांत पाटील यांनी पाच लाखांचा मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला सुपूर्द

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी पाच लाख रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. सामाजिक बांधिलकी जपत आमदार विक्रांत पाटील आणि बाळासाहेब पाटील यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हा पुढाकार घेतला व आई तुळजाभवानीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करावेत आणि संकटग्रस्त जनतेला मदत करण्यासाठी त्यांना अधिक सामर्थ्य द्यावे, अशी प्रार्थनाही केली.

दिवाळीच्या शुभपर्वावर प्रत्येकांच्या आयुष्यात सुख, समूद्धी आणि आनंद नांदो. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक संकटमुक्त होवोत. राज्याने विकासाची नवी शिखरे गाठत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना असल्याची भावना यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली. राज्यातील विविध भागांत पावसाचे अनियमित प्रमाण आणि शेती उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे शेतकरी वर्गासमोर आर्थिक आव्हाने निर्माण झाली आहेत. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यांची गरज आहे.



राज्य सरकारकडूनही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना आणि मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रयत्नांना सामाजिक संस्थांसह लोकप्रतिनिधींच्या मदतीची जोड मिळणे महत्त्वाचे आहे. याच भावनेतून आमदार विक्रांत पाटील यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील, स्वप्नील ढमाले, आकाश पाटील आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Add Comment

शेतकरी संकटात असताना कर्ज वसुलीसाठी तगादा नको! फायनान्स कंपन्यांना कृषीमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : “शेतकरी शेतातच उध्वस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक अडचणींचा विचार करून फायनान्स कंपन्यांनी वाहने

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांकडून आदिवासी विकासाचा आढावा; पुणे आणि बीडमध्ये विशेष सेवा सप्ताहाचे आयोजन

पुणे: भगवान बिरसा मुंडा यांची आज 151 वी जयंती. त्यानिमित्ताने राज्यात 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा

Nashik News: अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने ट्रे घेतला अन् चोरट्यांनी पळ काढला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक: नाशिकमधील एका सराफ दुकानातील चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या धक्कादायक घटनेची

Prahaar Marathi News Live, 11 November 2026 : कुलगाममध्ये जवानांवर गोळीबार, मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांच्या हल्ल्यात दोन CRPF जवान जखमी

Prahaar Marathi News Live दिनांक 11 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

रत्नागिरीत दिवाळीच्या तोंडावर महालक्ष्मी मिनी मॉल खाक; कोटींचे नुकसान

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील अतिशय वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर परिसरातील के. सी.

NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण आमच्याशिवाय होणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समान नागरी कायदा आणण्यावर सरकार ठाम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावरून राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण