‘कम ऑन कील मी’ वरून सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंची फजिती

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या ‘कम ऑन कील मी’ या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावरून जोरदार खिल्ली उडवली जात आहे. शिवसेनेने त्यांच्या या वक्तव्याचा समाचार मार्मिक व्यंगचित्राद्वारे घेतला आहे. काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेत शरद पवारांच्या पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे असे व्यंगचित्र काढून त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.


शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा मेळावा वरळी येथे पार पडला. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. तर, दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या उबाठा गटानेही कालच्याच दिवशी वर्धापन दिन साजरा केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात होते.



या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी ‘कम ऑन कील मी’ हे वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर फज्जा उडवला जात असून त्यावरच्या मीम्सचा पाऊस पडत आहे.


शिवसेनेने सध्याच्या राजकीय स्थितीवर व्यंगचित्राच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या एका हाती शरद पवारांची कुबडी दाखवून त्यांचे पाय लटपटत असल्याचे दाखवले आहे. तर, हिरव्या रंगाच्या काँग्रेसरुपी सिलेंडरने ते श्वास घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेऊन आणि शरद पवारांच्या पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.


तसेच, काँग्रेसची सोबत करून शिवसेनेच्या मूळ विचारांना उद्धव ठाकरे विसरल्याचे शिवसेनेने या व्यंगचित्रातून अधोरेखित केले आहे. दरम्यान, शिवसेनेने उद्धव ठाकरेंची अवस्था दाखवणारे हे व्यंगचित्र आपल्या सोशल मीडिया पेजेसवर प्रसिद्ध केले असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा