Dashawtar Marathi Movie: दिलीप प्रभावळकर एका गूढ अवतारात, १२ सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा एक नवा आणि गूढ अवतार लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' हा मराठी चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही एक भव्य गाथा असून ती कोकणच्या परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावली आहे.


दिलीप प्रभावळकरांचा ८० व्या वर्षी नवा आणि रहस्यमय अवतार
चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू अशा अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे दिलीप प्रभावळकर वयाच्या ८० व्या वर्षी एका पूर्णपणे वेगळ्या आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहेत. 'दशावतार'मधील त्यांची गूढ भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल आणि त्यांना एक चित्तथरारक अनुभव देईल असे म्हटले जात आहे.


कोकणात ५० दिवसांचे चित्रीकरण, सुबोध खानोलकर यांचे दिग्दर्शन
हा चित्रपट कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित आहे. कोकणातील नयनरम्य ठिकाणी सलग ५० दिवस चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना कोकणच्या भव्यतेचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेता येईल. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे.


सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे आहेत. लवकरच 'झी मराठी' वाहिनीवर या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळेल.


'दशावतार' हे एक भव्य आव्हान: दिलीप प्रभावळकर
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, "दशावतार चित्रपटात आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी, आव्हानात्मक आणि सगळ्यांना चकित करणारी भूमिका साकारायला मिळाली, याचा आनंद आहे. वयाची मर्यादा अभिनेत्यांना नसते, नवनवीन भूमिका आणि आव्हाने मला खुणावत असतात. याप्रमाणेच हे एक भव्य आव्हान आहे."


'दशावतार' हा कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार आहे, जो प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

Pravin Tarde Birthday: तो ब्लाॅकबस्टर आहे, तो डायलाॅगमास्टर आहे...प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त विजू मानेंची खास पोस्ट

Pravin Tarde Birthday: 'देऊळ बंद' फेम मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आज

Rohit Shetty on viral FB comment: रोहित शेट्टी यांचा खुलासा, फेसबुकवरील पोस्ट माझी नाही, बनावट खात्यांपासून सावध राहा

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका वादावर अखेर मौन सोडले आहे. त्यांच्या

Ranveer Sinh Grandfather: रणवीर सिंगच्या आजोबांचे निधन; बहीण सौम्याने शेअर केली भावूक पोस्ट

Ranveer Sinh: दिवाळीनिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या घरी दुःखद घटना घडली आहे.

IPL ची 'मिस्ट्री गर्ल' काव्या मारन अडकणार विवाहबंधनात! संगीतकार अनिरुद्धसोबत ग्रीसमध्ये साखरपुडा

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह-मालक काव्या मारन यांचा १० नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये

Marathi Entertainment News: 13 वर्षांनंतर पुन्हा जमणार ललित-प्राजक्ताची जोडी! नव्या चित्रपटातील सीन लीक?

Marathi Entertainment News: मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री

Ramayana Oscar 2027: रणबीर कपूरच्या रामायणची ऑस्करच्या शर्यतीत एंट्री?

मुंबई: बॉलीवूडचे ख्यातनाम आणि अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित व महाकाय