धक्कादायक ! रेल्वे अपघातात ७२००० जणांचा गेला जीव, माहिती अधिकारातून आकडेवारी स्पष्ट...

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या रेल्वेची धक्कादायक माहिती समोर आली. आतापर्यंत रेल्वे अपघातात ७२००० जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यातील १५०० मृत्यूदेह बेवारस असल्याची माहिती, माहिती अधिकारातून स्पष्ट झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा,कर्जत, चर्चगेट ते विरार,डहाणू रोड, सीएसएमटी ते वाशी, पनवेल अशा सर्व मार्गावरील हे अपघाती  मृत्यू आहेत. मुंबईतील प्रसिध्द डाॅक्टर सुरोश मेहता यांनी माहिती अधिकारातून रेल्वेरुळांवरील अपघात, बेवारस मृतदेह, यांची माहिती मागवली होती.

यापूर्वी  रेल्वेचा रुळ ओलंडताना २००२ ते २०२४ दरम्यान ७२ हजार ५२४ रेल्वे पोलिसांच्याकडे अपघाती रेल्वे मृत्यूची नोंद आहे, त्यातील २००९ ते २०२४ या वर्षात १४००० हून अधिक मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याने ते बेवारस स्थितीत होते. अशी बाब माहिती अधिकाऱ्यातून स्पष्ट झाली.  रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची ओळख पटवणे अशक्य आहे.

त्यातील बरेच मृतदेह  विच्छिन्न अवस्थेत असतात. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड आहे. रेल्वे अपघातात मृत्यू पडलेल्या प्रवाशांच्याकडे कोणतेही वस्तू सापडत नाही. तसेच ज्या मृतदेहाची ओळख पटली तर त्यांच्या नातेवाईकांपर्यंत मृतदेह पोहचवता येत नाही. अशी रेल्वे पोलिसांनी माहिती दिली.तसेच ज्या रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.त्यांचा मृत्यूदेह शवगृहात एक महिना ठेवला जातो. रेल्वे पोलिस खात्याअंतर्गत त्याच्या नातेवाईकाने हरवलेली व्यक्तीची कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली का ? याचा देखील तपशील तपासाला जातो.

रेल्वे अपघातातील आकडेवारी माहिती अधिकारातून स्पष्ट - 

रेल्वे रूळ ओलांडताना ४३,४२८
धावत्या लोकलमधून पडणे १४,३९६
अन्य १३,९४१
रेल्वे खांबाला धडक ४५६
फलाट आणि पायदान यांच्या पोकळीत पडून ३०३
एकूण ७२,५२४

पाच वर्षांतील बेवारस मृतांची संख्या

वर्ष बेवारस मृतदेह आप्त-नातेवाइकांना परत देण्यात आलेले मृतदेह
२०२० ---८२८ ---२८८
२०२१ ---१२७९ ---४७३
२०२२ ---१८१८ ---६८९
२०२३ ---१८७२ ---७१८
२०२४ ---१८६४ ---६०४

 

 

 

 

 
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर