दिनेश कार्तिकने केली टीम इंडियाची डॉबरमॅनशी तूलना, विधानाने खळबळ

लीड्स: इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा लीड्स कसोटीमध्ये 5 विकेट्सने निराशाजनक पराभव पत्करावा लागला. यामुळे इंग्लंड विरुद्ध  सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया ही 0-1 ने पिछाडीवर आहे. मात्र, या पराभवानंतर आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ती गोष्ट म्हणजे टीम इंडियाची तुलना ही चक्क डॉबरमॅन कुत्र्याशी करण्यात आली असून, ही तुलना भारताचा माजी क्रिकेटपट्टू दिनेश कार्तिक यानेच केली आहे. त्याच्या या विधानामुळे नवा वाद पेटू शकतो. काय आहे संपूर्ण प्रकरण?  जाणून घेऊया...

सध्या भारत इंग्लंड दौऱ्यावर असून, इथे भारत विरुद्ध इंग्लंड असे ५ कसोटी सामने खेळले जात आहेत. यामधील पहिला सामना नुकताच झाला असून, या सामन्यात भारतीय फलंदाजांनी 5 शतके झळकावूनही संघाला विजय खेचून आणता आला नाही.  आता याच कसोटीच्या निकालानंतर टीम इंडिया विषयी दिनेश कार्तिकने केलेले धक्कादायक विधान अमोर आले आहे. त्याने टीम इंडियाची तुलना ही चक्क डॉबरमॅन कुत्र्याशी केली. स्काय स्पोर्ट्सवर याबद्दल बोलताना दिनेश कार्तिक दिसून आला. मात्र त्याने अशी तुलना नेमकी का केली? काय आहे प्रकरण? जाणून घेऊया.

दिनेश कार्तिकने काय म्हटलं?





इंग्लंडच्या ब्रॉडकास्टर चॅनल, स्काय स्पोर्ट्सवर, माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकन क्रिकेट विश्लेषक म्हणून उपस्थित राहिला होता. त्या दरम्यानचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.  ज्यामध्ये तो म्हणतो, टीम इंडियाची फलंदाजी डॉबरमॅन कुत्र्यासारखी आहे, ज्याचे डोके चांगले आहे, मधला भाग ठीक आहे, परंतु ज्याला शेपूट नाही. त्याचं हे बोलण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या विधानामुळे चांगलीच खळबळ माजली असून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

दिनेश कार्तिकने भारतीय फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी का केली?


दिनेश कार्तिक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी का करतो यामागे देखील एक कारण आहे. दिनेश कार्तिकने व्हिडिओमध्ये जे विधान केले,  त्यात टीम इंडियाचं डोकं (हेडला) चांगलं म्हटलं आहे. भारतीय फलंदाजी क्रमातील हेड म्हणजे टॉप ऑर्डर. जर आपण लीड्समध्ये खेळलेल्या भारताच्या दोन्ही डावांवर नजर टाकली तर टॉप ऑर्डरची कामगिरी चांगली झाल्याचे दिसून आलं. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये, टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी विकेटवर टिकून रहात शतक झळकावलं, यशस्वी आणि गिलने पहिल्या डावात शतक झळकावले असेल, तर केएल राहुलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्यानंतर त्याने मधला भाग ओके असल्याचे म्हंटले, म्हणजे टीम इंडियाच्या मिडल ऑर्डर फळीचा तो उल्लेख करतो.  तिथे ऋषभ पंतने धावफलकावर खूप धावा केल्या. त्याने दोन्ही डावात शतक झळकावले. त्याच्याशिवाय जडेजा आणि करुण नायर यांनीही काही चांगल्या धावा केल्या. पण ज्याप्रकारे डॉबरमन कुत्र्यांना शेपटी नसते. अगदी त्या प्रकारे टीम इंडियाच्या शेवटच्या फळीने अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्याच तो स्पष्ट करतो. भारताच्या खालच्या फलंदाजाच्या  खराब कामगिरीमुळे संघाचा  स्कोअरबोर्ड काही धावांनी कमी पडला. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात ६ विकेटवर ४५३ धावा करणारी टीम इंडिया नंतर फक्त ४७१ धावांवर ऑलआउट झाली. तर दुसऱ्या डावात ६ विकेट्स गमावून ३३५ धावा करणाऱ्या टीम इंडियाचा सर्व खेळ पुढे अवघ्या ३६४ धावांवर आटोपला.
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून