राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार

मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर एक समिती स्थापन करून धोरण तयार करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंह यांच्यासह नगर विकास व गृह विभागाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्यात वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांनी आपापल्या स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असले तरी यामध्ये एकसंधपणा नसल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर समिती स्थापन करून सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे धोरण मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले.


राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा स्तर उंचावण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरत असून, त्यांचा वापर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे यापुढे सार्वजनिक सीसीटीव्ही सर्व ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे श्री. कदम यांनी स्पष्ट केले.


नवीन धोरणानुसार कोणती यंत्रणा कोणत्या प्रकारचे सीसीटीव्ही बसवेल, त्यांचा देखभाल खर्च, फुटेज, यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे निश्चित केले जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून, ती संपूर्ण प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे, असेही कदम यांनी यावेळी नमूद केले.

Comments
Add Comment

एका सदस्याच्या अपात्रतेमुळे संपूर्ण कुटुंबाचा रेशनचा लाभ बंद करू नका; राज्य अन्न आयोगाची सरकारला सूचना

मुंबई : एकाच शिधापत्रिकेवर समाविष्ट असलेल्या कुटुंबातील एखादा सदस्य अपात्र ठरल्यास संपूर्ण कुटुंबाचा

Kurla Crime: कुर्ल्यात दिवसाढवळ्या गोळीबाराचा थरार! तीन गोळ्या झाडून 40 वर्षीय व्यक्तीची हत्या

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात बुधवारी दुपारी दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात विनोद मल्लाप्पा पवार (वय 40) यांचा

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 13 आरोपी जेरबंद

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे आणि अटल सेतू जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू, फक्त 59 मिनिटांत मुंबई

मुंबई: मुंबई- पुणे प्रवास अधिक जलद आणि सुखकर करण्याच्या दृष्टीने सरकारकडून विशेष पाऊलं उचलली जात आहेत. मुंबई-

मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग; एसीमधील शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज

मुंबई: दिवाळीच्या सणात राज्यभरात विविध ठिकाणी आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता एक अत्यंत

Mumbai Traffic News: छठ पूजेनिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; घर सोडण्यापूर्वी नक्की वाचा महत्त्वाचे नियम

मुंबई: मुंबई महानगर पालिकेकडून मुंबई शहरामध्ये यंदा छठ पूजेनिमित्त जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.