शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात झाला आहे . आधी खून आणि नंतर आत्महत्येच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे .



गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतीच्या वादाने काल नवीनच वळण घेतले. वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात मोहिजे कुटुंबात शेतीच्या वाटपावरून वाद सुरू होते . हा वाद इतका चिघळला की आरोपी महेंद्र मोहिजे याने त्याची चुलती साधना सुभाष मोहिजे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय २७) यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले . त्यात या दोघांचाही मृत्यू झाला . त्यानंतर घाबरलेल्या आरोपी महेंद्र मोहिजेने देखील विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली . या घटनेनंतर अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनी घटनास्थळाची पाहणी केली . यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवले गेले .


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता . शेतीच्या मालकीहक्कावरून आणि मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते. त्या वादातून महेंद्र मोहिजेने हे पाऊल उचलले . घटनास्थळी हजर असलेल्या आणि शेजारी राहणाऱ्या लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत . अधिक तपास अल्लीपूर पोलीस करत आहेत .

Comments
Add Comment

इंस्टाग्राम रील्स बनवून मिळवा 1 लाख रुपये! महाराष्ट्र सरकारची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी नवी संधी

सोशल मीडियावर रील्स, शॉर्ट्स आणि व्हिडिओ तयार करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता

गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या 3 समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई: महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद झाली आहे.

Nashik : आंघोळीसाठी धरणात उतरले अन् काळाने गाठले, वडिलांसह दोन मुलींचा दुर्दैवी अंत

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या अंजनेरी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार विक्रांत पाटील यांनी पाच लाखांचा मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला सुपूर्द

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना मदतीचा हात

शेतकरी संकटात असताना कर्ज वसुलीसाठी तगादा नको! फायनान्स कंपन्यांना कृषीमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : “शेतकरी शेतातच उध्वस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक अडचणींचा विचार करून फायनान्स कंपन्यांनी वाहने

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांकडून आदिवासी विकासाचा आढावा; पुणे आणि बीडमध्ये विशेष सेवा सप्ताहाचे आयोजन

पुणे: भगवान बिरसा मुंडा यांची आज 151 वी जयंती. त्यानिमित्ताने राज्यात 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा