कशेडी घाटातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा

संबंधित अधिकाऱ्यांसह तहसीलदारांकडून पाहणी


पोलादपूर : जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत रस्त्यावर भेगा पडल्याची बातमी एप्रिल महिन्याअखेरिस वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता स्थानिक ग्रामस्थपर्ग रूंदावणाऱ्या भेगांमुळे खडबडून जागा झाला आहे.


पावसाळयात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी हा प्रकार गांभिर्याने विचारात घेत तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या लक्षात आणून दिली. यामुळे शुक्रवारी तहसिलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घटनास्थळी पाहणी केली व येत्या दोन दिवसात तत्काळ दुरुस्ती करण्याबाबत सूचना दिली.



पळचिल ग्रुप ग्रामपंचायतिचे माजी सरपंच उमेश मोरे, रवींद्र जाधव, प्रवीण मोरे, ग्रामस्थ आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भुयारी मार्गे चौपदरीकरण काम करण्यात आले. यावेळी भोगाव गावाच्या हद्दीत डोंगरांचे उत्खनन करून डोंगर कापण्यात आला. नवीन महामार्ग भुयारामार्गे वळविण्यात आला. याठिकाणी जवळच भोगावच्या हद्दीत जुन्या मार्गावरील रस्त्याला ५ ते १० मीटर अंतरावर मोठया प्रमाणात भेगा पडल्याने प्रस्तुत प्रतिनिधीने बातम्यांद्वारे संभाव्य धोक्याकडे यंत्रणांचे व ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. या बातम्यांमध्ये पावसाळयात येथील रस्ता खचून नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.


सद्यस्थितीत कशेडी घाटातील वाहतूक भुयारीमार्गे होत असल्याने कातळी बंगला म्हणजेच कशेडी टॅपच्या जुन्या नाक्यापर्यंत नेणाऱ्या जुन्या महामार्गावर वाहतूक प्रमाणात सुरू आहे. यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा नसला तरी भविष्यात किंवा पावसाळयात भुयारामार्गे काही अनुचित प्रकार घडल्यास पुन्हा मूळ कशेडी घाटातील जुन्या महामार्गावरून पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक वळवावी लागणार आहे.


यासाठी हा जुन्या महामार्गाची देखभाल दुरुस्ती अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने वेळीच भेगा रूंदावण्यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी सूचना तहसिलदार कपिल घोरपडे यांनी संबंधित अभियंत्यांना केली आहे.


पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील २००५ च्या अतिवृष्टीत खचलेला रस्ता दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ९० ते १०५ फूट लांब आणि २ ते ५ फूट खोल खचला असून तेथे उभा करण्यात आलेला प्रोकलेनदेखील गरजेनुसार हलविण्यात येत असून यावर्षी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग सुरू झाल्याने या खचणाऱ्या डेंजरझोनकडे डागडुजी करण्यात अक्षम्य दिरंगाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

गड वाचवणं म्हणजे इतिहास वाचवणं; तरुणांनी शिवरायांकडून शिकावं - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संविधान दिनाच्या निमित्ताने ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ हे अभियान रायगडावर आज पार पडलं आणि उपमुख्यमंत्री

संविधान दिनी राज्यातील 11 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान! रायगडावर 'गडांचा मान, संविधानाचा सन्मान'

रायगड : भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन

Raigad Road Accident: श्रीवर्धनहून परतताना काळाचा घाला! म्हसळा बायपासवर कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे रात्री उशिरा भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. श्रीवर्धन-माणगाव मार्गावरील म्हसळा

Alibaug Traffic Tragedy: सायरन वाजत होता, आई-वडील रडत होते; पण वाहतूक कोंडीने हिरावला २० महिन्यांच्या चिमुरड्याचा जीव!

रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नियोजनामुळे एखाद्याचा किती मोठा नुकसान होऊ शकते, याची जाणीव करून देणारी

Raigad Fire : उरणमध्ये तेल निर्मिती प्रकल्पाला भीषण आग; आकाशात धुराचे लोट, सिडको अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

Uran : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरणजवळील वेश्वी गावात सोमवारी एका औद्योगिक गोदामाला भीषण आग लागल्याची

Uran Water Shortage: उरणकरांनो पाणी जपून वापरा! ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांवर पाणी कपातीचे संकट

उरण: उरण शहरामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे उरण शहरातील