रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नियोजनामुळे एखाद्याचा किती मोठा नुकसान होऊ शकते, याची जाणीव करून देणारी एक हृदयद्रावक घटना रायगड जिल्ह्यातील अलिबागमधून समोर आली आहे. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात असतानाही वेळेवर उपचार मिळू न शकल्याने अवघ्या 1 वर्षे 8 महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलाला वाचवण्यासाठी आई-वडिलांची सुरू असलेली धडपड, रुग्णवाहिकेचा वाजणारा सायरन आणि दुसरीकडे रस्त्यावर लागलेली वाहनांची लांबच लांब रांग, या घटनेने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.(Alibag Traffic)
नेमकी घटना काय?
आरांश सुशील ठाकूर असे मृत चिमुरड्याचे नाव असून तो अलिबाग तालुक्यातील बामणगाव येथील रहिवासी होता. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण दीडच्या सुमारास आरांश घराच्या अंगणात खेळत होता. खेळता खेळता त्याने फुगा गिळला. त्यामुळे फुगा घशात अडकल्याने त्याची प्रकृती अचानक गंभीर झाली. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आई-वडिलांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली.
Dawood House Demolition: भेंडी बाजारातील दाऊदच्या घरावर महापालिकेची कारवाई; धोकादायक इमारत जमीनदोस्त होणार
Dawood House Demolition: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे शहर ऐतिहासिक आणि गर्दीचा भाग म्हणून ओळखला जातो. यंत्रमाग उद्योगाची राजधानी, गोदामांचे जाळे आणि व्यापाराची मोठी ...
रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली
आरांशला तातडीने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होते. मात्र, बेलकडे-अलिबाग मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रुग्णवाहिकेलाही पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत नव्हता.
एकीकडे चिमुरड्याची प्रकृती गंभीर होत होती, तर दुसरीकडे रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली होती. रुग्णवाहिकेचा सायरन वाजत होता. आई-वडील आपल्या मुलाला वाचवण्यासाठी लोकांकडे रस्ता देण्याची आर्त विनंती करत होते. मात्र, या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी रुग्णवाहिकेला तब्बल दीड ते दोन तासांचा विलंब झाला.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उशीर
अखेर दुपारी साधारण चार वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिका अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आरांशला मृत घोषित केले. ज्या मुलाच्या हसण्याने घरात आनंदाचे वातावरण असायचे, त्याच चिमुरड्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.(Ambulance Stuck In Traffic)
Madhavi Nimkar viral video: कोकणच्या मातीशी जोडली नाळ! अभिनेत्री माधवी निमकर गावाकडच्या परंपरेत रमली; हाताने जमीन सारवतानाचा व्हिडीओ चर्चेत
आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात गावाकडच्या साध्या-सुध्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो. मातीचा सुगंध, निसर्गाची साथ आणि वर्षानुवर्षे जपल्या ...
रस्त्याच्या कामाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर अलिबागमधील रस्त्यांच्या कामाचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याचे काम सुरू असताना पर्यायी मार्गाची व्यवस्था होती का? वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे कर्मचारी तैनात होते का? आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला तातडीने मार्ग मिळण्यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या कामकाजाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली जात आहे. रस्त्यांची कामे विकासासाठी आवश्यक असली, तरी अशा कामांदरम्यान रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आरांशच्या दुर्दैवी मृत्यूने अलिबागमधील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत. एका चिमुरड्याचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन या घटनेतून धडा घेणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.(Traffic Tragedy)