कोकणात पक्षाची ताकद वाढवणारे रविंद्र चव्हाण होणार महाराष्ट्र भाजपाध्यक्ष

मुंबई : राज्यात महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. भाजपाकडून निवडणूक अधिकारी म्हणून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नेमणूक झाली आहे. सोमवारी ३० जून २०२५ रोजी महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्यातील भाजपाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला. अद्याप महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदासाठी रविंद्र चव्हाण यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आलेला नाही. यामुळे रविंद्र चव्हाण यांची निवड ही निव्वळ औपचारिकता असल्याची चर्चा आहे.

रविंद्र चव्हाण यांनी भाजपाचे युवा कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास केला आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल. कोकणात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी आली तर कोकणात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

रविंद्र चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज

‘"राष्ट्र प्रथम्, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून, अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो. या वाटचालीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ आणि जनतेचे आशीर्वाद लाभले. या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या पाठबळावर आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केंद्रीय मंत्री किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला. यापुढच्या वाटचालीत देखील तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मोलाचे ठरणार आहेत,’ असे रविंद्र चव्हाण म्हणाले.



Comments
Add Comment

Thane Crime : ठाणे ग्रामीण भागात शाळेतील कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; २२ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर अटक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यावर २२ अल्पवयीन विद्यार्थिनींनी

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड