Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा हा आयपीओ  ७ जुलैपर्यंत बिडींगसाठी बाजारात उपलब्ध असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओसाठी, प्राईज बँड (Price Band) २३३ ते २४५ रूपये प्रति समभाग (Share) निश्चित करण्यात आला आहे. माहितीनुसार, आयपीओ बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होईल. किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) आयपीओकरिता कमीत कमी १४२१३ रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूकी अर्ज करताना किमान ६१ गठ्ठे (Lot) खरेदी करावे लागतील असे कंपनीने म्हटले आहे. Equiris Capital Private Limited ही कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार असून MUFG Intime Private Limited (Link Intime) कंपनी या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहेल. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) ७ जुलैपासून होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा आयपीओ ९ जुलैला बाजारात सूचीबद्ध होऊ शकतो. एकूण ३.५१ कोटी मूल्यांकनाचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) साठी उपलब्ध असणार आहेत.

कंपनीने म्हटल्याप्रमाणे, या आयपीओतील एकूण गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार ५०% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% वाटा उपलब्ध असणार आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी ६१ समभाग म्हणजेच एक गठ्ठयासाठी बोली लावणे अनिवार्य असेल.

कंपनीबदल -

ही कंपनी २०११ साली स्थापन झाली होती. B2B ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ (Online Education Platform) असून कंपनी परदेशी उच्च शिक्षणाच्या सेवा, सुविधा पुरवते. कंपनीचे प्रवर्तक डॉ विकाश अग्रवाल, पिंकी अग्रवाल, मनिष अग्रवाल आहेत. कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२८७.०७ कोटी रुपये आहे.

कंपनीची सद्य आर्थिक स्थिती -

कंपनीला आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील मार्च २०२४ मध्ये ७६३.४४ कोटींचा महसूल (Revenue) प्राप्त झाला होता. तो इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) वाढत मार्च २०२५ पर्यंत ८८४.८४ कोटींवर गेला आहे. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (EBITDA) मध्ये मार्च २०२४ मधील ७२.६४ कोटी तुलनेत वाढ होत मार्च २०२५ मध्ये नफा २१२.८२ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीला करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली आहे. मार्च २०२४ मधील ११८. ९० कोटींच्या तुलनेत करोत्तर नफ्यात १५२.९३ कोटींपर्यंत वाढ झाली आहे.

कंपनीने आपल्या DHRP मध्ये प्रतिक्रिया दिली की, 'कंपनीने दाखल केलेल्या DRHP नुसार, कंपनीने नमूद केलेल्या काही जोखीम घटकांमध्ये हे समाविष्ट आहे.आमची कंपनी आमच्या महसुलासाठी काही जागतिक उच्च शिक्षण संस्थांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अशा जागतिक उच्च शिक्षण संस्थांचे कोणतेही नुकसान आमच्या व्यवसायावर, ऑपरेशन्सच्या परिणामांवर आणि आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम करू शकते. आम्ही आमच्या एजंट्सच्या सेवेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत. अशा कोणत्याही किंवा सर्व एजंट्सच्या नुकसानाचा आमच्या व्यवसायावर, ऑपरेशन्सच्या परिणामांवर आणि आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आमचे यश जागतिक उच्च शिक्षण संस्थांसोबतच्या आमच्या सततच्या सहकार्यावर अवलंबून आहे. अशा जागतिक उच्च शिक्षण संस्थांसोबत आमचे सहकार्य टिकवून ठेवण्यास असमर्थतेचा आमच्या व्यवसायावर, कामकाजाच्या निकालांवर आणि आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.'
Comments
Add Comment

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे आणि अटल सेतू जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू, फक्त 59 मिनिटांत मुंबई

मुंबई: मुंबई- पुणे प्रवास अधिक जलद आणि सुखकर करण्याच्या दृष्टीने सरकारकडून विशेष पाऊलं उचलली जात आहेत. मुंबई-

Navi Mumbai: कळंबोलीत पोलिसालाच भरधाव कारची धडक! २०० मीटरपर्यंत फरफटत नेले; चालक फरार, कारचा नंबरही बनावट!

Navi Mumbai: नवी मुंबईतील गजबजलेल्या कळंबोली (Kalamboli) या परिसरातील रोडपाली येथे नाकाबंदी दरम्यान एक धक्कादायक घटना समोर

Marathi Entertainment News: 13 वर्षांनंतर पुन्हा जमणार ललित-प्राजक्ताची जोडी! नव्या चित्रपटातील सीन लीक?

Marathi Entertainment News: मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री

Petrol Pump Viral Video: पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल देण्याची नेमकी युक्ती काय? कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

Petrol Pump Viral Video: अगदी खेड्यापाड्यांपासून ते शहरांपर्यंत सगळीकडे पेट्रोल पंप सर्रास आढळतात. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी

Mumbai Traffic News: छठ पूजेनिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; घर सोडण्यापूर्वी नक्की वाचा महत्त्वाचे नियम

मुंबई: मुंबई महानगर पालिकेकडून मुंबई शहरामध्ये यंदा छठ पूजेनिमित्त जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाऊबीजेला बहिण भावाला नारळ का देते? काय आहे या परंपरेमागील धार्मिक महत्त्व आणि श्रद्धा?

Bhaubeej 2026: दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची आणि