भाऊबीजेला बहिण भावाला नारळ का देते? काय आहे या परंपरेमागील धार्मिक महत्त्व आणि श्रद्धा?

दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची कामना करतात. मात्र, या दिवशी औक्षण करण्यासोबतच भावाला नारळ देण्याची परंपराही पाळली जाते. पण ही प्रथा नेमकी आहे तरी काय? आणि त्यामागे कोणती धार्मिक मान्यता आहे, तुम्हाला माहीत आहे का?

Bhaubeej 2026: दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची कामना करतात. मात्र, या दिवशी औक्षण करण्यासोबतच भावाला नारळ देण्याची परंपराही पाळली जाते. पण ही प्रथा नेमकी आहे तरी काय? आणि त्यामागे कोणती धार्मिक मान्यता आहे, तुम्हाला माहीत आहे का?


भाऊबीजचा सण हा बंधुप्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळून त्याच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर भावाला मिठाई भरवतात आणि अनेक ठिकाणी बहिणी भावाला नारळदेखील देतात.


यामागील कारण म्हणजे, भाऊबीज पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात नारळाला शुभता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. धार्मिक विधींपासून ते शुभ कार्यांच्या प्रारंभापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपण नारळाचा वापर हमखास करतो. भाऊबीजच्या दिवशी भावाला नारळ देण्याची प्रथा देखील याच परंपरेशी जोडलेली आहे.



नारळ देण्यामागील श्रद्धा
धार्मिक परंपरेनुसार, नारळ हे देवाचे आवडते फळ मानले जाते. याला श्रीफळ असेही म्हणतात. कोणत्याही शुभ प्रसंगी आपण नारळ अर्पण करून शुभकामाला सुरवात करतो. असे मानले जाते की, यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होण्यास मदत होते. तर भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना नारळ देतात. हे त्यांच्या दीर्घायुष्याच्या आणि सुखाच्या इच्छेशी निगडित आहे. असा म्हणतात की नारळ देऊन बहिणी आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, सुखासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करतात. तसेच, नारळ भावाला वाईट नजर आणि नकारात्मकतेपासून वाचवतात.

एका आख्यायिकेनुसार, या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे आले होते. यमुनेने त्यांचे स्वागत केले, त्यांना टिळा लावला आणि भोजन दिले. बहिणीच्या प्रेमावर प्रसन्न होऊन यमराजांनी तिला एक वरदान दिले. तेव्हापासून, भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. नारळ देऊन, बहीण आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, प्रगतीसाठी आणि आनंदासाठी शुभेच्छा देते. अशा प्रकारे, टिळा आणि नारळ भाऊ-बहिणीच्या नात्याला अधिकच खास बनवतात.

(Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Comments
Add Comment

Kolkata- Mumbai Flight Threat: कोलकाता- मुंबई विमानाला अपहरणाची धमकी, विमानामध्ये चिठ्ठी सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई: कोलकाता- मुंबई विमान अपहरणाची धमकी देण्यात आली आहे. एअर इंडिया कंपनीचं हे विमान आहे, या विमानाला हायजॅकची

Train Window Grill: ट्रेनच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या का असतात? काच असतानाही जाळी लावण्यामागची 4 महत्त्वाची कारणे!

Train Window Grill: भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. ट्रेनने प्रवास करताना आपण नेहमी खिडकीजवळ बसून

Nashik News: अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने ट्रे घेतला अन् चोरट्यांनी पळ काढला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक: नाशिकमधील एका सराफ दुकानातील चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या धक्कादायक घटनेची

Vande Bharat New Route:: वंदे भारतच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता मडगाव ते यशवंतपूर मार्गावरून धावणार ट्रेन

Vande Bharat New Route: भारतातील रेल्वेची सर्वात प्रीमियन एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत 15 नोव्हेंबर पासून

Matrubhumi Trailer 2026: सलमान खानच्या मातृभमी ट्रेलरवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया; मेजर सोइबा मॅनिंगबा यांना अधिक स्क्रीन टाइम मिळायला हवा होता...

Matrubhumi Trailer 2026: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा बहुप्रतीक्षित मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस हा चित्रपटाचा ट्रेलर अखेर 10

Gmail स्टोरेज वारंवार फुल होतोय? मग ‘ही’ ट्रिक वापरून काही सेकंदातच करा फ्री स्पेस

[caption id="attachment_1073767" align="aligncenter" width="800"] Gmail मध्ये असे अनेक जुने मेसेज असतात, ज्यांच्यासोबत फोटो, व्हिडिओ किंवा मोठे डॉक्युमेंट्स