अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू केले. 'एमटी यी चेंग'वर असलेल्या १४ क्रू ना वाचवण्यात आले. यात आठ खलाशी आणि सहा अधिकारी आहेत. जहाजावरील सर्व जण सुरक्षित आहेत. वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी करुन सर्व क्रू सदस्य सुखरुप असल्याचे सांगितले. आयएनएस तबर घटनास्थळाजवळ उपस्थित आहे.

भारतीय नौदलाने तातडीने कारवाई केली आणि जहाजाला लागलेली आग विझवली. यामुळे समुद्रात संकटात सापडलेले जहाज वाचले.

पलाउ देशाचा ध्वज असलेली नौका

प्रशांत (पॅसिफिक) महासागरातील पलाउ हा छोटा देश आहे. पलाउ फिलिपाईन्सच्या पूर्वेला ८०० किमी व जपानच्या दक्षिणेला ३२०० किमी अंतरावर आहे. या देशाचा ध्वज असलेली 'एमटी यी चेंग' नावाची तेलवाहक नौका अरबी समुद्रातून प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान तेलवाहक जहाजाला आग लागली. आग लागल्यामुळे जहाजावरील विजेचा पुरवठा ठप्प झाला. भारतीय नौदलाने तातडीने मतकार्य सुरू केले. या मदतीमुळे जहाज आणि जहाजावरील क्रू सुरक्षित आहे. आग विझविण्यात आली आहे. आयएनएस तबरवरील नौसैनिक आणि 'एमटी यी चेंग' जहाजावरील अधिकारी - कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करुन जहाजाच्या इंजिन रूमला लागलेली आग विझवली.

जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय वंशाचे

'एमटी यी चेंग' या तेलवाहक जहाजावरील सर्व १४ अधिकारी - कर्मचारी हे भारतीय वंशाचे आहेत. भारतीय नौदलाने या सर्वांना वाचवले आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा