नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे बेकायदा झोपड्या व पक्क्या इमारतींचे पेव फुटले आहे. १० वर्षांपासून खाडीकिनारी खारफुटींवर रॅबिट वा मातीचे ढिगारे टाकून तिथे झोपड्या उभारल्या जात आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेकायदा बांधकामांकडे तहसीलदार, वनखाते आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नदीचे नाले आणि नाले अधिकाधिक रुंद होत चालले आहे. नदी पुनर्जिवीत कशी होणार? असा जटील प्रश्न, सतर्क नागरिकांना, पर्यावरण प्रेमीना भेडसावत आहे.
चारकोप आणि गोराईतील जवळपास ४० हेक्टर परिसर खारफुटीच्या वनांनी व्यापला आहे. वनविभागाने संपूर्ण जागा संरक्षित वनविभाग असल्याचे फलकही लावले आहेत.

गोराई ते दहिसरपर्यंत जवळपास ८० हेक्टर परिसरात खारफुटी आहे. चारकोप गाव, गोराई खाडी, एमएचबी कॉलनी परिसर, एक्सर, धर्मानगर आणि गणपत पाटीलनगर परिसरातील खारफुटीवर व दलदलीच्या भागात रात्री डेब्रिज टाकले जाते. त्याखाली खारफुटी गाडल्या जातात. काही दिवसांनंतर स्थानिक गुंड आणि काही स्वयंघोषित कार्यकर्ते भंगारवाले, रद्दीवाले व तबेलेवाल्यांना तिथे आणून ठेवतात. सुरुवातीला प्लास्टिकचे झोपडे उभारून आणि नंतर पत्र्याचे वा पक्के बांधकाम करून ते विकले जातात. चारकोप-गोराई जोडणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी मांडली भूनिका चारकोप गोराई, बोरिवली-दहिसरमधील गणपत पाटीलनगरात खारफुटीची कत्तल करून मोठी झोपडपट्टी वसलेली आहे. राजकारण्यांची हक्काची मतपेटी असल्याने राजकीय पक्षांच्या स्वयंघोषित नेत्यांचे अतिक्रमणाला वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. खाडीपुलाच्या बाजूलाही अशाच प्रकारचे बेकायदा व्यवसाय उभे राहिले आहेत.

बेकायदा बांधकामावर महापालिका, तहसीलदार, पोलीस खाते आणि वनखात्याकडून कारवाई होत नाही. तक्रारदारांची नावे स्थानिक गुंडांपर्यंत पोहोचत असल्याने तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नाही, यामुळे मिठी नदी, दहिसर नदी असो वा पॉईसर नदी.. यां नद्यांचे नाले झाले आहेत. याचं नदी नाल्यांना तट भिंती नसल्याने, त्या नद्या अनधिकृत बांधकामत अरुंद होत आहेत. नदीला पुनर्जीवीत करण्यासाठी अनेक वर्ष रिव्हर मार्च (रॅली) निघाली; परंतु अजून ही याकडे सरकारचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पुरेपूर लक्ष नाही. लक्ष असते तर हे असे नदी-नाल्यांमध्ये, मॅग्रासच्या जागेवर अतिक्रमण अनधिकृत बांधकाम झाले नसते. संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि संरक्षण भिंत बांधवी तरच नदी वाचेल आणि नदी पुनर्जिवीत करता येईल, अशी कैफियत मांडण्यात आली आहे.
Comments
Add Comment

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत