पुणे लैंगिक छळ: मोठा खुलासा , तक्रार खोटी!

पुणे: काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार समोर आली होती, ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणाच्या पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असा कोणताही प्रकार घडलाच नव्हता आणि ही संपूर्ण घटना तरुणीच्या मानसिक अस्थैर्यामुळे घडली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.


बुधवारी (४ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात होते. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रेसिंग आणि परिसरातील नागरिकांची चौकशी केली. सकाळी ९ वाजता पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, तरुणीला सीसीटीव्ही क्लिप दाखवण्यात आली, परंतु तिने आरोपीला ओळखण्यास नकार दिला.


तो तरुण तरुणीच्या ओळखीचाच


पोलिसांनी इमारतीतील ४४ फ्लॅटमधील रहिवाशांची चौकशी केली. यात स्पष्ट झाले की, संशयित तरुण कोणताही डिलिव्हरी बॉय नव्हता आणि त्याने कोणत्याही अधिकृत प्रवेशाशिवाय घरात प्रवेश केला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक केला, ज्यात तो रात्री ३ वाजता बाणेर येथे असल्याचे आढळले. अधिक तपासात, हा आरोपी तरुणीच्या ओळखीचाच असल्याचे स्पष्ट झाले.


सेल्फी संमतीनेच, 'मी पुन्हा येईन' मजकूरही तरुणीनेच लिहिला


या प्रकरणात व्हायरल झालेल्या सेल्फीबद्दलही महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सेल्फी तरुणीच्या संमतीनेच काढले गेले होते आणि त्या फोटोसोबत असलेला "मी पुन्हा येईन" हा मजकूर खुद्द तरुणीनेच लिहिल्याचे तिने प्राथमिक जबाबात मान्य केले. घटनेच्या वेळी आपली मानसिक अवस्था स्थिर नसल्यामुळे आपण चुकीची तक्रार दिली, असे तरुणीने पोलिसांना सांगितले.


५०० अधिकारी तपासात, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा


या संवेदनशील प्रकरणाच्या तपासासाठी क्राईम ब्रँचचे २०० अधिकारी आणि स्थानिक पोलीस दलातील ३०० अधिकारी असे एकूण ५०० पोलीस कर्मचारी कार्यरत होते. पुणे पोलीस विभागाने या घटनेबाबत स्पष्ट केले आहे की, ही घटना वास्तव नसून कपोलकल्पित आहे. तसेच, अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरीत दिवाळीच्या तोंडावर महालक्ष्मी मिनी मॉल खाक; कोटींचे नुकसान

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील अतिशय वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर परिसरातील के. सी.

NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण आमच्याशिवाय होणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समान नागरी कायदा आणण्यावर सरकार ठाम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावरून राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची चाहूल! किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट; पुढील काही दिवस हवामान कोरडे

Weather News: महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने

Gokul Milk Union : गोकुळच्या संदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या बाजूने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका; राहुल गांधींवरही टीका

मुंबई : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे महायुतीने सत्ता

Pratiksha Nagar Fire : वडाळ्यात 2 ते 4 झोपड्यांना आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

Mumbai News: मुंबईतील वडाळा येथील प्रतीक्षा नगर परिसरात आगीची घटना घडली. माला गार्डनजवळील सुमारे 2 ते 4 झोपड्यांना आग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या