Passenger Jump from Plane: आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या, १८ जण जखमी; कुठे घडली ही घटना? जाणून घ्या

स्पेन: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, विमानांच्या लहान-मोठ्या अपघातांबद्दलच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. ज्यामध्ये आता स्पेनमधील पाल्मा दे मॅलोर्का विमानतळावरील रायनएअरच्या बोईंग ७३७ विमानाबाबतची बातमी समोर आली आहे. शनिवारी मँचेस्टरला जाणारे हे विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच, या विमानाला आगीचा इशारा देण्यात आला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली, ज्यात एकूण १८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अरब टाईम्सच्या वृत्तानुसार, आपत्कालीन विभागाला परिस्थितीची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विमानतळावरील अग्निशमन दल आणि सिव्हिल गार्डच्या सदस्यांसह प्रादेशिक आपत्कालीन समन्वय केंद्राने चार रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या होत्या.

काही प्रवाशांनी विमानाच्या पंखावरून मारल्या उड्या


घटनेदरम्यान, प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने विमानातून बाहेर काढण्यात आले, तर काही प्रवाशांनी सुरक्षिततेसाठी विमानाच्या पंखावरून थेट जमिनीवर उडी मारली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही प्रवासी घाबरून आपत्कालीन मार्गातून विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत. याचबरोबर, काही प्रवासी आधी विमानाच्या पंखावर चढताना आणि नंतर जमिनीवर उडी मारताना दिसत आहेत.


सर्व जखमी प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय सेवा


प्रादेशिक आपत्कालीन समन्वय केंद्राच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अठरा प्रवासी जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेला रायनएअर या विमान कंपनीने दुजोरा दिला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “४ जुलै रोजी पाल्माहून मँचेस्टरला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण, आगीची खोटी सूचना देणारा दिवा चालू झाल्यामुळे थांबवावे लागले. यानंतर विविध उपाययोजना करून प्रवाशांना खाली उतरवून टर्मिनलवर आणण्यात आले.”

गेल्या आठवड्यात, अमेरिकन एअरलाइन्सच्या एका विमानात अशीच एक घटना घडली होती. त्या विमानाच्या एका इंजिनाला हवेत आग लागली होती. १५३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स असलेल्या या विमानाचे उड्डाणानंतर काही वेळातच लास वेगासमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते.
Comments
Add Comment

व्हाईट हाऊसमध्ये राडा! डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या AI व्हिडिओने उडवली खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक डिजिटल

जेन्सन हुआंग यांच्याभोवती हेरगिरीचा संशय; चीनने आरोप फेटाळले, तंत्रज्ञान जगतात खळबळ

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज जेन्सन हुआंग यांच्यावर हेरगिरी होत असल्याच्या वृत्तांनी कॉर्पोरेट

Jensen Huang : एनव्हिडियाचे CEO जेन्सन हुआंग चौकशीच्या फेऱ्यात; अ‍ॅलिस हुआंग यांच्यावरील हेरगिरीच्या संशयामुळे खळबळ

Jensen Huang: जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांच्याभोवतीचा वाद

Egypt Railway Accident 2026: इजिप्तमध्ये भीषण रेल्वे अपघात; दोन ट्रेनची टक्कर, 7 जणांचा जागीच मृत्यू

Egypt Railway Accident 2026: इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेकडील भागात रविवारी 8 नोव्हेंबर 2026 रोजी दोन रेल्वेगाड्यांची जोरदार

इस्रायलमध्ये नेतान्याहू यांना सत्तेचा धक्का! गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेची संधी; बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत

जेरुसलेम : इस्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सत्तेला आव्हान

जपान हादरले! मध्य जपानमध्ये 5.7 तीव्रतेचा महाभूकषक; डझनभर नागरिक जखमी

जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी पहाटे