Egypt Railway Accident 2026: इजिप्तमध्ये भीषण रेल्वे अपघात; दोन ट्रेनची टक्कर, 7 जणांचा जागीच मृत्यू

इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेकडील भागात रविवारी 8 नोव्हेंबर 2026 रोजी दोन रेल्वेगाड्यांची जोरदार धडक झाली. या ट्रेन अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 100 जण गंभीर जखमी झाले आहेत. गिझा ते फयूम येथून जाणारी रेल्वेगाडी कैरो ते अस्वान जाणारी दुसरी रेल्वेगाडी एकमेकांना धडकल्या. ज्यामुळे रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि अपघातात सात जणांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले

Egypt Railway Accident 2026: इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेकडील भागात रविवारी 8 नोव्हेंबर 2026 रोजी दोन रेल्वेगाड्यांची जोरदार धडक झाली. या ट्रेन अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 100 जण गंभीर जखमी झाले आहेत. गिझा ते फयूम येथून जाणारी रेल्वेगाडी कैरो ते अस्वान जाणारी दुसरी रेल्वेगाडी एकमेकांना धडकल्या. ज्यामुळे रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि अपघातात सात जणांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले.


इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीत, या अपघातात सुरुवातीला 4 जणांचा मृत्यू झाला व 100 जण गंभीर जखमी झाले. अशी माहिती सांगण्यात आली. तसेच मृतांमध्ये रेल्वेच्या एका चालकाचाही समावेश आहे. सदरचा हा अपघात कैरोपासून सुमारे 52 किलोमीटर दक्षिणेस असलेल्या गिझा गव्हर्नोरेटमधील 'अल अय्यात' (Al-Ayyat) जिल्ह्यात घडला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाचलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली आणि रुग्णवाहिकांना तातडीने बोलवण्यात आले. तेथील स्थानिक रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार, थांबलेल्या रेल्वेच्या एका डब्यात काही प्रवासी अडकले होते; परंतु त्यांना बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता.


इजिप्तमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत असून त्यात रेल्वे रुळावरून घसरणे, एकमेकांना धडकणे, सिग्नल यंत्रणेचा अभाव अश्या अनेक गोष्टींमुळे अपघातांच्या घटना वारंवार घडत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वे प्रणालीतील दीर्घकाळ चाललेले गैरव्यवस्थापन आणि उपकरणांची अपुरी देखभाल. मात्र, अलीकडच्या काळात सरकारने रेल्वे नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यासाठी आधुनिकीकरणाचे उपक्रम हाती घेतले आहेत.



राष्ट्रपतींनी चौकशीचे आदेश दिले.


इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फताह अल-सिसी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत या अपघाताची त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. इजिप्त रेल्वे प्राधिकरणाने, अपघातस्थळी मदत पथके आणि क्रेन पाठवण्यात आली आहेत, जेणेकरून ढिगारा हटवून रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करता येईल, असे सांगितले आहे. तसेच या भीषण अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून, आपण अत्यंत चिंतित असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, "ज्यांनी निष्काळजीपणा दाखवला आहे, त्यांना सोडले जाणार नाही; जबाबदार असलेल्यांना शिक्षा केली जाईल."

इजिप्तमध्ये सर्वात भीषण अपघात 2002 मध्ये झाला होता. कैरोच्या दक्षिणेला सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग लागली होती. या आगीत 370 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर, 2009 मध्ये त्याच परिसरात झालेल्या अनेक रेल्वे अपघातांमध्ये डझनभर लोकांचा बळी गेला.

Comments
Add Comment

इस्रायलमध्ये नेतान्याहू यांना सत्तेचा धक्का! गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेची संधी; बहुमत सिद्ध करण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत

जेरुसलेम : इस्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सत्तेला आव्हान

जपान हादरले! मध्य जपानमध्ये 5.7 तीव्रतेचा महाभूकषक; डझनभर नागरिक जखमी

जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी पहाटे

Yemen Airstrikes: सौदीच्या हल्ल्याने येमेन हादरले! 13 चिमुकल्यांसह 33 जणांचा मृत्यू

येमेनच्या सना प्रांतात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने केलेल्या रक्ताच्या नद्या वाहणाऱ्या हवाई

Indian Army Fact Check: चीनने अरुणाचल प्रदेशात 50 किमी भूमी बळकावली? नेमकं सत्य काय?

चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना पराभूत करून अरुणाचल प्रदेशात सुमारे ५० किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतल्याच्या

Code 100 : इराणमध्ये 'कोड 100' जारी, संपूर्ण लष्कर हाय अलर्टवर ? पश्चिम आशियात युद्धाचे सावट

Code 100 :संपूर्ण पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इराणने आपल्या सर्व सशस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवलं

पुतिन यांच्या दूताची थेट व्हाईट हाऊसमध्ये एन्ट्री! ट्रम्प यांच्या एका ‘मोठ्या’ निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपणार?

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले महाभयंकर युद्ध आता अखेर अंतिम