Historical Raghuji Bhosle Sword: शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार १५ ऑगस्टच्या आधी महाराष्ट्रात परत येणार!

सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची माहिती


मुंबई :  शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा १५ ऑगस्टच्या आधी लंडनहून महाराष्ट्रात परत आणू, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज दोन्ही सभागृहात दिली.

विधानसभा सभागृहामध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ नुसार विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने जी चर्चा उपस्थित केली होती तसेच विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावाला उत्तर देताना आज सांस्कृतिक कार्य विभागा मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांनी उत्तर दिले.

काय म्हणाले आशीष शेलार?


नागपूरच्या भोसले घराण्यातील शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसले यांची तलवार ही लिलावात निघाली होती आणि त्याला भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची मालमत्ता समजून ती पुन्हा आणण्यासाठी एक चांगला प्रयोग, चांगला प्रयत्न हा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रयत्नातून सफल झाला आहे. आपल्या इतिहासातली, आणि मराठ्यांच्या पराक्रमाची एक विरासत असलेली ही ऐतिहासिक तलवार आपण पुन्हा एकदा मिळवण्यात सफल झालेलो आहोत.

रघुजी भोसले प्रथम आणि त्यांच्या तलवारीबद्दल सविस्तर 


छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रघुजी भोसले प्रथम १६९५ ते १७५५ हे मराठा सैन्यातील सेनापती होते नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक त्यांना केले. शौर्यासाठी आणि युद्धनीतीसाठी रघुजी भोसले यांना ‘सेना साहेब सुभा’ ही पदवी छत्रपती शाहू महाराजांनी दिली. या तलवारीची लिलाव २९ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आला. या तलवारीवर  रघुजी भोसले यांचं नाव कोरलेल आहे. तसेच या तलवारीची वजमूठ सोन्याची आहे. रघुजी युद्धामध्ये या तलवारीचा वापर करत असत. जी ब्रिटीश राजवटीत ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतातून परदेशात गेली.

जवळपास ७० लाखाच्या बोलीने महाराष्ट्र सरकारने तलवार ताब्यात घेतली


ही ऐतिहासिक तलवार लंडनच्या लिलावात गेल्यावर महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याला संमती मिळण्यामध्ये कार्यालयीन व्यवस्था उभ्या केल्या. त्या व्यवस्थेमध्ये प्रवीण चल्ला यांच्या माध्यामतून महाराष्ट्र शासनाने लिलावात बोली केली आणि जवळ जवळ ६९ लाख ९४ हजार ४३७ करा सहीत ही तलवार आपल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

१५ ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रात येणार


आता कस्टम क्लीअरन्स, पॅकिंग, हाताळणी या सगळ्या बाबतीसाठी स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती करून १५ ऑगस्टच्या आधी जुलै महिन्यातच आपल्या मराठ्यांच्या, मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या पराक्रमाची साक्ष असलेली ही तलवार आपण सन्मानपूर्वक महाराष्ट्रात या भूमीमध्ये परत आणू आणि ती सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी सविस्तर माहिती मंत्री शेलार यांनी सभागृहासमोर ठेवली.
Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या