Chandrashekhar Bawankule: मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयाचे बावनकुळे यांकडून स्वागत

मराठीच्या अस्मितेसाठी थेट केंद्रातून निघाला 'हा' महत्वाचा आदेश


मुंबई: सध्या मराठी अस्मिता आणि मराठी संबंधित मुद्द्यावर राजकारणात अनेक डावपेच खेळले जात आहे. त्रीसूत्री भाषा प्रकरणावरून सुरू झालेला मराठी अस्मितेचा विषय आज मीरा भाईंदर येथे झालेल्या मोर्चापर्यंत पोहोचला. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेचे महत्व लक्षात घेता, याबाबतचा एक आदेशच केंद्रीय गृहमंत्रालयांकडून निघाला आहे.  भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटरच्या (Chandrashekhar Bawankule Tweets) माध्यमातून, मराठी भाषेविषयी केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या अतिशय महत्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.


सातत्यानं मराठीच्या मुद्द्यावरुन विरोधक आपली राजकीय पोळी भाजत आहेत, ज्यामुळे सामान्य मराठी लोकांच्या मनात भाजपप्रणीत महायुती सरकारच्या विरुद्ध कटुता निर्माण करण्याचे मनसुबे आखले जात असताना,  केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेला आदेश महायुती सरकारला दिलासा देणारा आहे. इतकेच नव्हे तर समस्त मराठी भाषिकांसाठी देखील ही एक आनंदाची बातमी आहे.



काय निघाला आदेश?


भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दल नुकतंच ट्विट केलं असून यात त्यांनी म्हटलं की, "समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की, मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीनं घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं माय मराठीचा अगोदरच गौरव केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजात करण्यात येणाऱ्या या क्रांतिकारी बदलाचा प्रत्येक मराठी भाषिक आनंदाने स्वागत करतो आहे. हा महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार."


 


मराठीसाठी वेगळं पाऊल


या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांकडून पंतप्रधानांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचं सांगितलं जात आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी नुकतंच 'महाराष्ट्र धर्म' नावाचं पॉडकास्टही सुरु केलं आहे. त्यानंतर आता थेट केंद्र सरकारकडून मराठीतून आलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

गोकुळवर कब्जा करण्याची सरकारला गरज नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षात पाच शासकीय सदस्यांची नियुक्ती

Maharashtra Political News: यंदाची शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळी; नवनाथ बन यांचे प्रतिपादन

Maharashtra Political News: राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, मराठवाडा परिसर आणि विदर्भासह

Ahilyanagar News: जिल्हा बँकेच्या राजकारणानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली सभापती राम शिंदे यांची भेट, चर्चेमागचं कारण काय?

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतलेले

अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या- सुनील तटकरेंचे वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना अजित पवार यांचे निधन झाल्याने

Praful Patel Meets Sharad Pawar : प्रफुल पटेल यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि पार्थ पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या नाराजीच्या

संविधानाशी खेळाल तर हात भाजल्याशिवाय राहणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा

मुंबई : "विरोधकांना ‘रिजिम चेंज’ करायची आहे, म्हणजेच सत्ता परिवर्तनाच्या माध्यमातून देशात डावी व्यवस्था