मॉर्निंग वॉक किंवा व्यायामानंतर पाणी पिताना 'ही' घ्या काळजी, अन्यथा...

अनेक लोकांना याची माहिती नसते की मॉर्निंग वॉक किंवा कोणताही व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे. बऱ्याचदा घाम आल्याने आणि शरीराचे तापमान वाढल्याने लगेच तहान लागते आणि लोक कोणताही विचार न करता घटाघट पाणी पितात. पण, तज्ज्ञांच्या मते, व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.


व्यायामानंतर लगेच पाणी का पिऊ नये?


जेव्हा आपण चालतो किंवा कोणताही व्यायाम करतो, तेव्हा आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि घाम येऊ लागतो. या काळात रक्ताभिसरण वाढते आणि शरीराला सामान्य तापमानावर येण्यासाठी थोडा वेळ लागतो. अशा स्थितीत लगेच पाणी प्यायल्यास खालील अडचणी येऊ शकतात.


सर्दी किंवा खोकला: वाढलेल्या शरीराच्या तापमानात अचानक थंड पाणी प्यायल्याने शरीर एकदम थंड होऊन सर्दी किंवा खोकला होऊ शकतो.


पोटात दुखणे: प्रचंड तहान लागलेली असताना अचानक जास्त पाणी प्यायल्यास पोटात दुखू शकते किंवा चमक मारू शकते.


पचनावर परिणाम: लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावू शकते, ज्यामुळे अपचन होऊ शकते.


वॉक किंवा व्यायामानंतर किती वेळाने पाणी प्यावे?


तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चालणे थांबवल्यानंतर किमान २० ते ३० मिनिटांनी पाणी प्यावे. या काळात तुम्ही काही वेळ बसून हलके स्ट्रेचिंग करून शरीराला 'कूल डाऊन' करू शकता. जेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके (पल्स रेट) सामान्य होतील आणि घाम येणे बंद होईल, तेव्हा पाणी पिणे योग्य राहील.


या टिप्स फॉलो करा:


हळूहळू प्या: एकाच वेळी जास्त पाणी पिण्याऐवजी हळू हळू एक-एक घोट पाणी प्या.


रूम टेंपरेचरचे पाणी: थंड पाणी पिण्याऐवजी हलके कोमट पाणी पिणे नेहमीच चांगले.


हायड्रेटेड रहा: केवळ चालतानाच नव्हे, तर संपूर्ण दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा. खूप घाम येत असेल, तर साध्या पाण्याऐवजी नारळ पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ शकता.


योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने शरीर लवकर रिकव्हर होण्यास मदत होते आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. त्यामुळे यापुढे वॉक किंवा व्यायाम करताना तहान लागल्यास थोडे थांबा, रिलॅक्स व्हा आणि मग सावकाश पाणी प्या.



(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)

Comments
Add Comment

नवरा-बायको दोघेही कमावतात, तरी बचत शून्य? ‘या’ ४ चुका ठरतात कारणीभूत!

घरात नवरा बायको दोघेही कामाला जातायंत पण तरीदेखील महिन्याच्या शेवटी बचत होत नाहीय? याचं कारण फक्त जास्त खर्च

Legal Will: मृत्यूपत्र कसे बनवायचे? किती खर्च येतो, काय आहेत नियम? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप...

मुंबई: सध्याच्या घडीला माणसाचा एका मिनिटाचाही भरोसा नाही. आयुष्यात काय अनपेक्षित घडेल हे कोणालाच माहीत नाही.

लग्नाच्या आधी की लग्नानंतर? Term Insurance केव्हा घ्यायचा! 99.9% लोकांना माहितीच नाही; आत्ताच जाणून घ्या

मुंबई: लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये आपण कपडे, दागिने, लग्नाचे ठिकाण, लग्नामध्ये जेवणासाठी कोणकोणता मेन्यू हवा आणि

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Phone Call Anxiety : फोन कॉल आला की वाढते धडधड? जाणून घ्या 'टेलिफोन अँग्झायटी'मागचं नेमकं कारण

फोन वाजला की स्क्रीनवरील नाव बघून अनेक जणांच्या मनात पहिल

खुशखबर! Amazon आणि Flipkart वर फेस्टिव्ह सेल सुरू; कार्ड ऑफर्सचा वापर करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी!

सध्या सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे Amazon आणि Flipkart या दोन्ही प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या फेस्टिव्ह सेलचे