जर गीझर चालू करताच वीज वारंवार जात असेल आणि हे तुमच्या लक्षात येऊन देखील एक सामान्य समस्या म्हणून एमसीबी किंवा ब्रेकर चालू करतात. तर वारंवार वीज जाणे हे गीझरमधील मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते. हे हीटिंग एलिमेंटमधील बिघाड, सदोष वायरिंग किंवा विजेच्या गळतीमुळे असू शकते. शिवाय, सदोष गीझर जास्त वीज वापरून तुमचे विजेचे बिल देखील वाढवू शकतो. त्यामुळे गीझर चालू करताच वीजपुरवठा खंडित होत असेल तर सर्वप्रथम एमसीबी (MCB) किंवा आरसीसीबी (RCCB) खराब झाला आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. (Geyser Electricity Saving Tips)
गीझर चालू केल्यानंतर जर आरसीसीबी (RCCB) वारंवार ट्रिप होत असेल, तर त्याचे कारण विद्युत गळती असू शकते. पाण्यातील मीठ आणि इतर अशुद्ध घटकांमुळे हीटिंग एलिमेंटवर एक थर तयार होऊ शकतो. कालांतराने, एलिमेंटचा बाहेरील थर खराब होतो, ज्यामुळे विद्युत प्रवाह पाण्यापर्यंत किंवा टाकीपर्यंत पोहोचतो. गळके पाईप, ओलावा आणि जुन्या वायरिंगमधील झिजलेले इन्सुलेशन यामुळे देखील हे होऊ शकते. जर गीझर काही मिनिटे चालल्यानंतर ट्रिप होत असेल, तर हीटिंग एलिमेंटमध्ये बिघाड असू शकतो.
'रामायण'ने 'पुष्पा 2'ला मागे टाकलं! आता 'बाहुबली 2'चा विक्रम मोडण्यासाठी फक्त 11कोटींची गरज
Ramayana Movie Box Office: रणबीर कपूरचा रामायण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड ब्रेक करीत आहे. बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रूल'ला मागे टाकून रामायण ...
तसेच सकाळी अनेकजण उठल्याबरोबर गीझर सुरू करतात आणि बराच वेळ तसाच चालू ठेवतात. असं केल्याने विजेचा वापर वाढू शकतो. त्यापेक्षा अंघोळ करण्यापूर्वी किंवा पाणी वापरण्यापूर्वी काही वेळ आधीच गीझर सुरू करावा. पाणी गरम झाल्यानंतर तो बंद करावा.
गीझरचं तापमान गरजेपेक्षा जास्त ठेवल्यास देखील जास्त वीज खर्च होऊ शकते. सर्वसाधारणपणे 50 ते 55 अंश सेल्सिअस इतकं तापमान घरगुती वापरासाठी पुरेसं ठरू शकतं. मात्र, योग्य सेटिंग ही गीझरच्या मॉडेलवर आणि तुमच्या गरजेवर अवलंबून असते.
तसेच गीझरमधील बिघाडाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. बहुतेक ब्रँड्सच्या हीटिंग एलिमेंट्सची किंमत सुमारे 400 ते 1500 रुपये असते. थर्मोस्टॅट बदलण्यासाठी देखील जवळपास तेवढाच खर्च येऊ शकतो. याउलट, नवीन स्टोरेज गीझर खरेदी करण्यासाठी 5000 ते 15,000 रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येऊ शकतो. जर तुमचा गीझर वॉरंटीमध्ये असेल, तर तो दुरुस्त करण्यापूर्वी वॉरंटी कार्ड नक्की तपासा.