आंबेनळी घाटात दरड कोसळली

वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा


पोलादपूर : महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरवर्षीप्रमाणे यंदाही दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे घाटातील रस्त्यांवर दरडी कोसळत असून, नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी (दि.१९) झालेल्या मुसळधार पावसात पुन्हा दरड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


गेल्या १४ दिवसांत या मार्गावर चार वेळा दरड कोसळली आहे. सुरुवातीला घाट चार दिवस बंद ठेवण्यात आला होता. १५ जुलैनंतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली असली, तरी १५ ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.


संपूर्ण रस्त्याचे काम सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे काम संथ गतीने सुरू आहे. शनिवारी दुपारी चिरेखिंड-बावली टोकजवळ दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने माती आणि दरड बाजूला करण्यात आली आणि एकेरी मार्ग सुरू करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.


तहसीलदार कपिल घोरपडे आणि पोलीस एपीआय आनंद रावडे हे घाट परिसरात सतत पाहणी करत आहेत. चिरेखिंड-बावली परिसरात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला होता. मात्र, कंपनीचे अभियंते आणि प्रशासन यांच्या समन्वयाने तातडीने काम हाती घेऊन वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Raigad Shed Collapse : रायगडमध्ये मोठी दुर्घटना : खालापूरजवळ लॉजिस्टिक वेअरहाऊसचे शेड कोसळले; २० ते २५ कामगार अडकल्याची किंवा जखमी झाल्याची भीती

रायगड : रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यातील

Panvel Karjat Double Railway Line: पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; प्रवाशांची प्रतीक्षा संपणार?

पनवेलकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पनवेल - कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आले असून

Diveagar Accident : दिवेआगर दुर्घटनेची सखोल चौकशी होणार; दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.

दिवेआगर बीचवर सहल ठरली शेवटची...; पुण्यातील 8 विद्यार्थी समुद्रात बुडून मृत

रायगड : रायगड जिल्ह्यातील अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर असलेल्या दिवेआगर बीचवर (Diveagar Beach) एक अत्यंत हृदयद्रावक आणि

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर थरार! चालत्या बसमधून धुराचे लोट अन् काही क्षणातच...; 14 प्रवाशांचा थरारक जीव वाचला

पनवेल : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. पनवेल हद्दीतील

Pen ganpati idol : पेणच्या गणेशमूर्तींचा जगभरात डंका! यंदा ७० लाखांहून अधिक मूर्तींची विक्री; तब्बल २० लाख बाप्पा परदेशात रवाना

पेण : गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2026) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील